ETV Bharat / sitara

सलमानने शेअर केला भन्साळींच्या चित्रपटातील 'या' अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो - debut

सलमानने अभिनेत्रीचा फोटो शेअर करत तुझ्या या नव्या प्रवासात तुला खूप सारं प्रेम आणि जे हवं ते सर्व काही मिळो, असे कॅप्शन दिले आहे. हम दिल दे चुके सनम चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो आहे.

सलमानने शेअर केला 'या' अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो
author img

By

Published : May 19, 2019, 12:46 PM IST

मुंबई - बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी लवकरच चित्रपटसृष्टीला दोन नवे चेहरे देत आहेत. भन्साळी यांच्या आगामी 'मलाल' चित्रपटातून शर्मिन शेगल आणि मिझान जाफरी हे नवोदीत कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. आता भाईजानने शर्मिनचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भन्साळींच्या मलाल चित्रपटाचा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित झाला. हा ट्रेलर शेअर करत सलमानने शर्मिनचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती केक कापताना दिसत असून सलमान तिच्या बाजूला बसलेला आहे. हा फोटो भन्साळींच्याच 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवरील आहे.

salman khan
सलमानने शेअर केला 'या' अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो

आता या सुंदर लहानशा शर्मिनला मोठ्या पडद्यावर पाहण्याची वेळ जवळ आली आहे. तुझ्या या नव्या प्रवासात तुला खूप सारं प्रेम आणि जे हवं ते सर्व काही मिळो, असे कॅप्शन सलमानने दिले आहे. शर्मिन ही संजय लिला भन्साळींची बहिण बेला सेगल यांची मुलगी आहे.

Intro:Body:

ent 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.