मुंबई - बॉलिवूड भाईजान सलमान खान गेल्या काही दिवसांपासून 'दबंग ३'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. याच कारणामुळे सलमानने 'दबंग ३'च्या सेटवर मोबाईल बॅन केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात महेश मांजरेकर यांची मुलगी सईची वर्णी लागली आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार सेटवर मोबाईल बॅन करण्यामागे हेच कारण आहे. या चित्रपटातील सईचा लूक व्हायरल होऊ नये, यासाठी सलमान पुरेपुर खबरदारी घेत आहे.
यासाठी सईलाही अशा सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे, जिथून तिचे फोटो व्हायरल होऊ शकतात. सलमानला तिचा फर्स्ट लूक स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करायचा आहे. आता तिच्या या खास लूकबद्दल प्रेक्षकांची उत्कंठाही वाढली असणार, हे नक्की.