मुंबई - सलमान खान विरुद्ध कमाल आर खान (केआरके) मानहानी खटल्यात कमाल आर खान ह्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. सलमान खान यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यामध्ये सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत अभिनेता कमाल आर. खान (के.आर.के.) यांनी अभिनेता सलमान खान विरोधात आपत्तीजनक विधान न करण्याबद्दल बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्टात गुरुवारी आश्वासन दिले आहे.
सलमान खानची मागणी -
सलमान खान वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केआरकेच्या विरोधात आदेश देण्याची विनंती केली होती. की कोर्टाच्या आदेशापर्यंत सलमान खान, त्याचे व्यवसाय आणि त्यांच्या चित्रपट / प्रकल्पांवर कोणतीही बदनामीकारक सामग्री प्रकाशित करण्यास किंवा अपलोड करण्यास, पोस्ट करण्यास, ट्वीट करण्यास किंवा प्रकाशित करण्यास मनाई करावी.
केआरकेचे न्यायालयाकडे निवेदन -
याबाबत केआरकेच्या वतीने अॅड. मनोज गडकरी यांनी निवेदन केले की, पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत कोणतीही मानहानीची टिप्पणी दिली जाणार नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. सद्रानी यांनी गडकरी यांचे निवेदन नोंदवले आणि हे प्रकरण 7 जून 2021 रोजी सुनावणीसाठी ठेवली आहे.
काय आहे प्रकरण? -
फिर्यादी के.आर.के यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर 'भ्रष्टाचार बॉलीवूड' या नावाने पोस्ट केलेला एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने सलमान खानसह बॉलिवूड सेलिब्रिटींवर "निंदनीय, अत्यंत बदनामीकारक आरोप" केले आहेत. व्हिडिओमध्ये सलमान खानची प्रतिमा भ्रष्ट असल्याचा आरोप करण्यात आले होते, असे या तक्रारदारांनी म्हटले आहे.
नोव्हेंबर 2020 रोजी पोस्ट केलेल्या एका दुसर्या व्हिडिओमध्ये केआरकेने सलमान खानच्या ब्रँड 'बीइंग ह्यूमन'विरूद्ध ठामपणे दावा केला होता की ही धर्मादाय संस्था फसवणूक आणि मनी लॉड्रिंगमध्ये गुंतलेली आहे.
याबाबत सलमान खानने असा दावा केला आहे की, अशा प्रकारचे खोटे आरोप त्याच्या कित्येक वर्षांच्या मेहनत आणि प्रयत्नातून तयार केलेल्या त्याच्या ब्रँडची सद्भावना, प्रतिष्ठा आणि प्रतिमा डागाळत आहेत. आता ह्या प्रकरणात न्यायालय 7 जून 2021 रोजी सुनावणी करणार आहे.
हेही वाचा - अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर पुण्यात घरात घुसून चाकूहल्ला