ETV Bharat / sitara

सलमान खानने १ लाख सॅनिटायजर्स मुंबई पोलिसांना केले दान - salman donates frsh sanitiser

सलमान खानने मुंबई पोलिसांसाठी सॅनिटायजर्सच्या १ लाख बाटल्या दान केल्या आहेत. त्याच्या या दातृत्वाबद्दल चाहते त्याच्यावर खूश झाले आहेत.

Salman Khan
सलमान खान
author img

By

Published : May 30, 2020, 7:58 PM IST

मुंबई - सलमान खानने मुंबई पोलीस विभागाल हँड सॅनिटायजर्स दान केले आहेत.

सलमानचे कौतुक करताना युवा सेना नेते राहुल कनल यांनी ट्विटरवर लिहिलंय, सलमान भाई, तुम्ही आघाडीचे योध्दे म्हणून जे काम करीत आहात त्याबद्दल तुमचे आभार. @CMOMaharashtra @AUThackeray ji @MumbaiPolice @CPMumbaiPolice यासर्वांचेही आभार. FRSH सॅनिटायजर्सचे आघाडीवर काम करणाऱ्या पोलिसांना वाटप.

सलमानच्या या कृतीचे त्याच्या चाहत्यांनी स्वागत केले आहे.

एका चाहत्याने लिहिलंय, मेगास्टार सलमानने १ लाख FRSH सॅनिटायजर्सच्या बाटल्या मुंबई पोलिसांना कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान दान केल्या. #LoveUBhaijaan!"आणखी एका युजरने लिहिलंय, सलमान खान हा सोन्याच्या ह्रदयाचा व्यक्ती आहे. यामुळेच तो देशातील सर्वात आवडीचा सुपरस्टार आहे. always love #BeingHuman"

कोव्हिड १९ च्या या संकटात सलमान शक्य तितकी मदत करीत आहे. त्याने काही काळापूर्वी ३२ हजार रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना मदत केली होती. हे सर्व कर्मचारी ऑल इंडिया स्पेशल आर्टिस्ट असोसियशनचे सदस्य होते.

सलमानने तो राहत असलेल्या पनवेलच्या फॉर्म हाऊस जवळच्या खेड्यातील २५०० गरजू लोकांसाठी अन्न धान्य आणि जेवणाचा पुरवठा केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.