ETV Bharat / sitara

'भारत' चित्रपटानंतर 'टायगर'च्या तिसऱ्या भागातही दिसणार सलमान-कॅटरिनाची जोडी ! - ali abbas jafar

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी 'टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन्हीही  चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'भारत' चित्रपटाच्याही दिग्दर्शनाची धुरा ते सांभाळत आहेत.

'भारत' चित्रपटानंतर 'टायगर'च्या तिसऱ्या भागातही दिसणार सलमान-कॅटरिनाची जोडी
author img

By

Published : Mar 25, 2019, 5:55 PM IST

मुंबई - सलमान खान आणि कॅटरिना कैफ बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र झळकले आहेत. लवकरच त्यांचा 'भारत' चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोघांची जोडी 'टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन्ही चित्रपटात सुपरहिट ठरली. आता 'भारत' चित्रपटानंतर 'टायगर'च्या तिसऱ्या भागातही ही जोडी एकत्र झळकणार असल्याचे वृत्त आहे.

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी 'टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन्हीही चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'भारत' चित्रपटाच्याही दिग्दर्शनाची धुरा ते सांभाळत आहेत. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, 'भारत' चित्रपटानंतर लगेच 'टायगर' चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचीही तयारी करण्यात येणार आहे.

सलमान खान यानेही एका पुरस्कार सोहळ्यात याबाबत माहिती दिली आहे. 'सौदी फिल्म फेस्टीव्हल' येथे त्याने सांगितले, की 'कॅटरिनासोबतच 'टायगर'चा तिसरा भाग तयार करण्यात येईल. तसेच, कॅटरिना त्याची आवडती सहकलाकार असल्याचेही तो यावेळी म्हणाला'.

Intro:Body:

'भारत' चित्रपटानंतर 'टायगर'च्या तिसऱ्या भागातही दिसणार सलमान-कॅटरिनाची जोडी !

मुंबई - सलमान खान आणि कॅटरिना कैफ बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र झळकले आहेत. लवकरच त्यांचा 'भारत' चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोघांची जोडी 'टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन्ही चित्रपटात सुपरहिट ठरली. आता 'भारत' चित्रपटानंतर 'टायगर'च्या तिसऱ्या भागातही ही जोडी एकत्र झळकणार असल्याचे वृत्त आहे.

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी 'टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन्हीही  चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'भारत' चित्रपटाच्याही दिग्दर्शनाची धुरा ते सांभाळत आहेत. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, 'भारत' चित्रपटानंतर लगेच 'टायगर' चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचीही तयारी करण्यात येणार आहे.

सलमान खान यानेही एका पुरस्कार सोहळ्यात याबाबत माहिती दिली आहे. 'सौदी फिल्म फेस्टीव्हल' येथे त्याने सांगितले, की 'कॅटरिनासोबतच 'टायगर'चा तिसरा भाग तयार करण्यात येईल. तसेच, कॅटरिना त्याची आवडती सहकलाकार असल्याचेही तो यावेळी म्हणाला'.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.