मुंबई - अभिनेता सलमान खान लॉकडाऊननंतर एका चित्रपटाच्या निर्मितीली सुरुवात करणार आहे. मराठीत गाजलेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असेल. यात आयुष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
या चित्रपटात सलमान खान पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करणार आहे. गँगस्टरचा पिच्छा करणाऱ्या पोलिसाची ही भूमिका तो साकारेल. विशेष म्हणजे गँगस्टरच्या भूमिकेत आयुष झळकणार आहे.
मुळशी पॅटर्न हिट झाल्यानंतर प्रविण तरडे यांनी सलमानसाठी खास स्क्रिनिंग ठेवले होते. सलमान आणि त्याचा भाऊ अरबाज खान यांना हा चित्रपट खूप आवडला. त्यांनी याचा हिंदी रिमेक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुळशी पॅटर्नचे हक्कही त्यांनी विकत घेतले आहेत.
मुळशी पॅटर्न या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन प्रविण करडे यांनी केले होते. मात्र हिंदी रिमेकच दिग्दर्शन अभिराज मिनावाला करणार आहे. अभिभराजने लव्हरात्री या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. याच चित्रपटातून आयुष शर्माने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.