मुंबई - सलमान खान आपल्या सहकाऱ्यांना आणि दोस्तांना खूश करण्यासाठी कमी पडत नाही. कन्नड सुपरस्टार किचा सुदिपलाही सलमानच्या या दातृत्वाचा अनुभव आला. अलिकडे रिलीज झालेल्या 'दबंग ३' मध्ये सुदिपने खलनायक साकारला होता. त्याच्या कामावर भाईजान इतका फिदा झालय की त्याने चक्क बीएमडब्लू गाडी भेट दिली आहे.
ही सरप्रईज गिफ्ट घेऊन सलमान खान स्वतः किचा सुदिपच्या घरी पोहोचला होता. याचा उल्लेख त्याने इन्स्टाग्रामवर केला आहे.
किचाने हे सरप्राईज गिफ्ट स्वीकारल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट लिहिली आहे, तो लिहितो, ''जेव्हा तुम्ही चांगले करत असता तेव्हा तुमचे भलेच होत असते. हे सिध्द करत सलमान सर माझ्या घरी बीएमडब्लू M5 घेऊन पोहोचले. सर, मला आणि माझ्या कुटुंबीयांना इतके प्रेम दिल्याबद्दल तुमचे धन्नयवाद. तुमच्यासोबत काम करणे सन्मानाची गोष्ट आहे आणि तुम्ही घरी आलात त्याबद्दल आभार.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मिळालेल्या माहितीनुसार सलमानने किचाला दिलेल्या बीएमडब्लू कारची किंमत १ कोटी ५४ लाख इतकी आहे. 'दबंग ३' साठी किचाचे काम पाहून सलमानने त्याला यापूर्वीही एक जॅकेट किचाने या जॅकेटसोबतचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'दबंग ३' मधील किचा सुदिपच्या भूमिकेतचे सर्वत्र कौतुक झाले. गेल्या महिन्यात 'दबंग ३' रिलीज झाला होता.