मुंबई - गणेशोत्सवानिमित्त अनेक कलाकारांनी आपल्या घरी खास पाहुण्याचं म्हणजेच गणपती बाप्पाचं स्वागत केलं. मोठ्या भक्ती भावानं बाप्पाची सेवा केल्यानंतर आता कलाकारांनी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - गायिका नेहा राजपालनं बाप्पासाठी केला 'चांद्रयान -2'चा देखावा
सलमान खानची बहिण आर्पिता खान हिच्या घरीदेखील गणपतीचं आगमन झालं होतं. या बाप्पाच्या विसर्जनासाठी सलमानसह डेझी शाह आणि स्वरा भास्करसारख्या कलाकारांनीही हजेरी लावली. आता याच कलाकारांचा बाप्पाला निरोप देताना ढोल ताशांच्या गजरात ठेका धरलेला व्हिडिओ समोर आला आहे. सलमान अन् राधिकाचा हा गणपती डान्स चाहत्यांनाही थिरकायला भाग पाडणारा आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
याशिवाय अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंही आपल्या घरील बाप्पाला निरोप दिला आहे. यावेळी तिनं पती राज कुंदरा आणि मुलगा विहान यांच्यासोबत ठेका धरला. गेल्या १०वर्षात पहिल्यांदा बाप्पाचं विसर्जन करताना या खास दिवशी पाऊस आल्याचं आपण पाहिलं असल्याचं सांगत शिल्पानं यासाठी आनंद व्यक्त केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - जोकर सिनेमानं रचला इतिहास, ट्रेलरला आठ मिनिटे मिळाली स्टँडिंग ओव्हेशन