मुंबई - कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यावर लग्नाबद्दल संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सलमान खान आणि रणबीर कपूर वगळता बॉलिवूडमध्ये असा एकही स्टार शिल्लक नाही ज्याने कॅटरिना-विकीचे अभिनंदन केले नाही. आपल्याला माहिती असेल की, कॅटरिनाचे नाव सलमान आणि रणबीरसोबत अनेकदा चर्चेत आले आहे.
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी काल रात्री त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले. कॅटरिना-विकीच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर येताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी नवविवाहित जोडप्याला लग्नासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.





यात हृतिक रोशन, करिना कपूर खान, फरहान अख्तर, करिश्मा कपूर, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, श्वेता बच्चन, सोनम कपूर, आलिया भट्ट, नेहा धुपिया, अंगद बेदी, सामाजिक कार्यकर्त्या मलाला युसूफझाई, झोया कपूर, झोवी अख्तर, ज्यान अख्तर आदी कलाकार आहेत. सारा अली खान, टायगर श्रॉफ, अली अब्बास जफर, प्रीती झिंटा, स्वरा भास्कर, अनुराग कश्यप, मलायका अरोरा, कपिल शर्मा, शूजित सरकार, भूमी पेडणेकर, राजकुमार राव यांच्यासह अनेक स्टार्सनी या जोडप्याला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



सलमान खान आणि रणबीर कपूरसोबत कॅटरिना कैफ बॉलीवूड जगतात सर्वाधिक चर्चेत होती. परंतु अद्याप दोघांपैकी कोणीही कॅटरिना कैफ कौशलला लग्नाच्या शुभेच्छा पाठवल्या नाहीत. सलमान खान लग्नाच्या दिवशी त्याच्या दबंग टूरसाठी संयुक्त अरब अमिरातीला रवाना झाला होता, त्यानंतर कॅटरिना-विक्कीच्या लग्नासाठी सलमान राजस्थानला जाणार असल्याची अटकळ बांधली जात होती.
हेही वाचा - कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी घेतले 'सात फेरे'!! हिऱ्याची अंगठीची सर्वत्र चर्चा