ETV Bharat / sitara

सायरा बानू यांचा अँजिओग्राफीला नकार, दिलीप कुमार यांच्या मृत्यूने नैराश्य - सायरा बानू यांचे पती दिलीप कुमार

पूर्वाश्रीच्या प्रसिध्द अभिनेत्री सायरा बानू यांना हृदयाची समस्या असल्याचे निदान झाले आहे. पती आणि दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर त्या नैराश्याशी झुंज देत आहेत. डॉक्टरांनी CAG (कोरोनरी अँजिओग्राम) सुचवले, पण सायरा बानो यांनी वैद्यकीय प्रक्रिया करण्यास नकार दिला.

सायरा बानू यांचा अँजिओग्राफीला नकार
सायरा बानू यांचा अँजिओग्राफीला नकार
author img

By

Published : Sep 3, 2021, 7:01 PM IST

मुंबई - मुंबईतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना हृदयाची समस्या असल्याचे निदान झाले आहे. डॉक्टर एंजियोग्राम प्रक्रियेसाठी उत्सुक आहेत पण सायरा यांनी परवानगी नाकारली आहे, असे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी गुरुवारी सांगितले. जुलैमध्ये पती दिलीप कुमार यांना गमावलेल्या सायरा बोनू यांना श्वासोच्छवास, उच्च रक्तदाब आणि उच्च साखरेमुळे 28 ऑगस्ट रोजी खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल, त्यांच्या हृदयाच्या चाचण्या झाल्या आणि त्यांना तीव्र कोरोनरी सिंड्रोम असल्याचे निदान झाले आहे, असे हिंदुजा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी न्यूजवायरला सांगितले.

डॉक्टरांनी CAG (कोरोनरी अँजिओग्राम) सुचवले, पण सायरा बानू यांनी वैद्यकीय प्रक्रिया करण्यास नकार दिला आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. "एकदा त्यांनी संमती दिल्यावर डॉक्टर अँजिओग्राफी करू शकतात." त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर सायरा बानो नैराश्याशी झुंज देत आहेत. "त्या जास्त झोपत नाहीत. त्यांना घरी जायचे आहे," असे डॉक्टर म्हणाले. सायरा बानू यांना आयसीयूमधून डिस्चार्ज देण्यात येईल आणि लवकरच एका खोलीत हलवले जाईल.

सायरा बानू यांचे पती आणि स्क्रीन आयकॉन दिलीप कुमार यांचे 7 जुलै रोजी वयाच्या 98 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. सगीना आणि गोपीसह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले होते. या जोडप्याने 1966मध्ये लग्न केले. सायरा बानू यांनी 1961 मध्ये जंगली या चित्रपटातून शम्मी कपूर यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि ब्लफ मास्टर, झुक गया आसमान सारख्या चित्रपटांमध्ये त्या झळकल्या होत्या. आइ मिलान की बेला, प्यार मोहब्बत, व्हिक्टोरिया क्रमांक 203, आदमी और इंसान, रेशम की डोरी, शागीर्द आणि दिवाना हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.