ETV Bharat / sitara

साहोच्या हिंदी व्हर्जनचं बॉक्स ऑफिसवर शतक - बजेट

सिनेमाला चित्रपट व्यापार विश्लेषकांचा जरी संमिश्र प्रतिसाद मिळत असला, तरी प्रेक्षकांनी मात्र चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. या सिनेमाच्या केवळ हिंदी व्हर्जननंच पाच दिवसात १०० कोटींचा गल्ला पार केला आहे

साहोचं बॉक्स ऑफिसवर शतक
author img

By

Published : Sep 4, 2019, 11:32 PM IST

मुंबई - प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित साहो सिनेमा ३० ऑगस्टला प्रदर्शित झाला. या सिनेमाला चित्रपट व्यापार विश्लेषकांचा जरी संमिश्र प्रतिसाद मिळत असला, तरी प्रेक्षकांनी मात्र चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.

हेही वाचा - गणपती विसर्जन : ढोल ताशांच्या गजरात सलमानसह या कलाकारांनी धरला ठेका

या सिनेमाच्या केवळ हिंदी व्हर्जननंच पाच दिवसात १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. मंगळवारपर्यंत साहोच्या हिंदी व्हर्जनने १०२ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

सुजित यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा हिंदीसह तामिळ आणि तेलुगू या दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. आता हा सिनेमा आणखी किती कमाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ३५० कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा - प्राजक्ता गायकवाडने घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन, बाप्पाला घातलं साकडं

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.