मुंबई - सध्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचे आहे. कोट्यवधी चाहत्यांची लाडकी अभिनेत्री कॅटरिना कैफने आपल्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तिने पीपीई कीट घातलेला एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या फोटोमध्ये कॅटरिनाने पीपीई कीट घातले आहे. सोबतच फेसशिल्ड आणि मास्कही घातलेले आहे. 'सेफ्टी फर्स्ट, आऊटफिट नॉट बॅड इदर' असे कॅप्शन या फोटोला तिने दिले आहे. कॅटरिनाच्या या फोटोला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासह ४ लाख चाहत्यांनी लाईक केले आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीने कमेंट सेक्शनमध्ये 'बॉम्ब' असे लिहिले आहे.
अभिनेत्री कॅटरिना कैफ नेहमीच सोशल मीडियावर आपल्या अनेक गोष्टींबाबत चाहत्यांना माहिती देत असते. त्याबाबत फोटोज आणि व्हिडिओज् ती पोस्ट करत असते. यापूर्वी तिने एका सामाजिक संस्थेच्या अभियानात स्वयंसेवक झाल्याची आठवण शेअर केली होती. त्यात तिने मुलींच्या शिक्षणाबाबत जनजागृती केली होती.