ETV Bharat / sitara

संजय दत्त आणि पूजा भट्ट यांच्या प्रेमाची गाथा सांगणारा 'सडक २'चा नवा ट्रॅक रिलीज - समाधान मुखर्जी आणि उर्वी

'सडक 2' चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांनी नाकारले असले तरी चित्रपटाचे प्रमोशन आपल्या गतीने सुरू आहे. या चित्रपटाची गाणे एका पाठोपाठ रिलीज होत आहेत. आता या चित्रपटातील 'दिल की पुरानी सडक' या गाण्याचा ट्रॅक रिलीज झाला आहे.

Sadak 2's new track
'सडक २'चा नवा ट्रॅक रिलीज
author img

By

Published : Aug 24, 2020, 7:07 PM IST

मुंबईः आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या बहुचर्चित 'सडक 2' च्या निर्मात्यांनी विख्यात गायक केके यांनी गायलेल्या 'दिल की पुरानी सडक' या गाण्याचा ट्रॅक रिलीज केला आहे.

या व्हिडिओमध्ये संजय दत्त आणि पूजा भट्ट आहेत. १९९१ मध्ये आलेल्या सडक चित्रपटातील काही दृष्ये यात दिसतात. पूजाच्या आठवणीत हरवलेल्या संजय दत्तच्या पार्श्वभूमीवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.

पूजाच्या प्रेमात हरवलेल्या संजय दत्तची व्यथा या गाण्यात मांडण्यात आली आहे. पूजाच्या एका मोठ्या पोर्ट्रेट समोर संजय दत्त व्याकूळ आठवणीत हरवलेला दिसतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

समाधान मुखर्जी आणि उर्वी या संगीतकार जोडीने तयार केलेल्या या गीताचे बोल विजय विजयावत यांनी लिहिले आहेत.

हेही वाचा - अमिताभ यांनी सुरू केले 'कौन बनेगा करोडपती'चे शूटिंग

'सडक २' हा चित्रपट १९९१ मध्ये आलेल्या 'सडक' चित्रपटाचा सीक्वल आहे. सडक चित्रपटात सजय दत्त आणि पूजा भट्ट यांच्या प्रमुख भूमिका होत्या. २०२० मध्ये रिलीज होत असलेल्या सडक २ मध्ये आलिया भट्ट आणि आदित्य चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत.

'सडक २' चा प्रीमियर २८ ऑगस्टला डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपी वर होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.