ETV Bharat / sitara

RX100च्या हिंदी रिमेकसाठी अहान सज्ज, सेटवरील फोटो केले शेअर - मिलन लुथारिया

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. यासोबतच सेटवरील फोटोही त्यांनी शेअर केले आहेत, ज्यात सुनील शेट्टीही पाहायला मिळत आहे.

RX100च्या हिंदी रिमेकसाठी अहान सज्ज
author img

By

Published : Aug 7, 2019, 4:32 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सचं सध्या मोठ्या प्रमाणात पदार्पण होताना दिसत आहे. या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला असून सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच त्यानं या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. यासोबतच सेटवरील फोटोही त्यांनी शेअर केले आहेत, ज्यात सुनील शेट्टीही पाहायला मिळत आहे. हा चित्रपट RX100 या तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक असणार आहे. चित्रपटात अहान शेट्टीच्या अपोझिट अभिनेत्री तारा सुतारिया झळकणार असून या जोडीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • Filming begins... Glimpses from mahurat ceremony... Ahan Shetty - son of Suniel Shetty - begins his journey in #Hindi films with the #Hindi adaptation of #Telugu film #RX100... Costars Tara Sutaria... Directed by Milan Luthria... Produced by Sajid Nadiadwala. pic.twitter.com/KVZYJVcGAi

    — taran adarsh (@taran_adarsh) August 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. तर मिलन लुथारिया यांचे दिग्दर्शन असणार आहे. तेलुगू RX100 चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. अशात आता या सिनेमाच्या रिमेकला प्रेक्षकांची पसंती मिळते का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.