ETV Bharat / sitara

देशातील सर्व दहशतवादी हल्ल्यांसाठी RSS जबाबदार; गायिकेचा खळबळजनक आरोप

भारतातील सगळ्या समस्यांचे कारण आरएसएस असल्याचं तिनं म्हटलं आहे. आता तरी जागे व्हा, की तुम्ही तुमच्या आई बहिणीवर बलात्कार होण्याची वाट पाहात आहात? असा सवाल तिने केला आहे.

देशातील सर्व दहशतवादी हल्ल्यांसाठी RSS जबाबदार
author img

By

Published : Jun 19, 2019, 4:16 PM IST

मुंबई - २६/११ चा हल्ला आणि पुलवामासह देशात होणाऱ्या सर्व दहशतवादी हल्ल्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप हिप हॉप गायिका हार्डकौरनं केला आहे. आपल्या सोशल मीडियावर तिने ही पोस्ट शेअर केली आहे. भारतातील सगळ्या समस्यांचे कारण आरएसएस असल्याचं तिनं म्हटलं आहे.

या जातीयवादी पक्षाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले असल्याचं तिनं म्हटलं आहे. यावेळी तिने महात्मा गांधी आणि गौरी लंकेश यांच्या नावांचाही उल्लेख केला आहे. याशिवाय तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

RSS
देशातील सर्व दहशतवादी हल्ल्यांसाठी RSS जबाबदार

आता तरी जागे व्हा, की तुम्ही तुमच्या आई बहिणीवर बलात्कार होण्याची वाट पाहात आहात? की ते तुमच्यावर आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींवर करेपर्यंत वाट पाहात आहात? असा सवाल तिने केला आहे. या पोस्टनंतर तिला अनेकांच्या टीकांचा सामना करावा लागत आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.