ETV Bharat / sitara

कोरोनामुळे घाबरुन जाऊ नका, रोहित शेट्टीचे नागरिकांना आवाहन

सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांमुळे कोरोना पसरतो, अशा आशयाच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे रोहित शेट्टीने अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असा सल्लाही दिला आहे.

Rohit Shetty urges people to not panic as pets don't spread coronavirus
कोरोनामुळे घाबरुन जाऊ नका, रोहित शेट्टीचे नागरिकांना आवाहन
author img

By

Published : Mar 22, 2020, 4:03 PM IST

मुंबई - सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात जनता कर्फ्यू पाळला जात आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कलाविश्वातील सेलेब्रिटी नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करत आहेत. बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही नागरिकांना कोरोनाला घाबरुन न जाता जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्या, असे आवाहन केले आहे.

'घरातील पाळीव प्राण्यांमुळे कोरोना पसरत नाही. त्यांना घराबाहेर काढू नका', असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा -'जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्या', सलमान खानचे नागरिकांना आवाहन

सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांमुळे कोरोना पसरतो, अशा आशयाच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे रोहित शेट्टीने अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असा सल्लाही दिला आहे.

कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी बरेच कलाकार समोर आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांनी व्हिडिओ द्वारे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा -कोरोना कनिकाला, चिंता आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.