मुंबई - 'लुडो' चित्रपटातील एका सीनमध्ये अभिनेता रोहित सराफ बियर पिताना दिसतो. मात्र खरी बियर पिणे परवडणारे नव्हते. पण हा सीन पूर्ण करण्यासाठी त्याने एक शक्कल लढवली. याचा किस्सा त्याने एक व्हिडिओ शेअर करुन सांगितला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बियर पिण्याच्या जागी अॅपी फिझमध्ये इनो टाकून प्यालो, असा खुलासा रोहितने आपल्या व्हिडिओसोबत केला आहे.
हेही वाचा -''मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन'' : महेश टिळेकरांची अमृता फडणवीसांच्या गायनावर जोरदार टीका
त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, "लुडो बीटीएस. बिअर ऐवजी अॅपी फिझ प्लस इनोचा वापर. वेल नेव्हर माइंड."
हेही वाचा -पाहा, काजल अग्रवालच्या हनीमूनचे पतीसोबत समुद्रातील रोमँटिक फोटो
'लुडो' चित्रपटामध्ये राजकुमार राव, अभिषेक बच्चन, फातिमा सना शेख, आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी आणि सान्या मल्होत्रा देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.