ETV Bharat / sitara

रितेशची पत्नी जेनेलियाने दिले 'व्हल्गर आंटी' म्हणणाऱ्याला सडेतोड उत्तर - व्हल्गर आंटी

बॉलिवूडचे सर्वात सुंदर आणि आनंदी जोडपे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा अभिनेता अरबाज खानच्या चॅट शो 'पिंच -2' वर पोहोचले होते. 'पिंच 2' मध्ये युजर्स बॉलीवूड स्टार्ससाठी सोशल मीडियावर कशी प्रतिक्रिया देतात हे दाखवले आहे. शोचा होस्ट अरबाज खानने सोशल मीडिया युजर्सची एक कॉमेंट वाचली, ज्यात जेनेलियाला 'व्हल्गर आंटी' म्हटले होते.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा
author img

By

Published : Oct 1, 2021, 5:25 PM IST

हैदराबाद - बॉलिवूडचे सर्वात सुंदर आणि आनंदी जोडपे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा अभिनेता अरबाज खानच्या चॅट शो 'पिंच -2' वर पोहोचले होते. 'पिंच 2' मध्ये युजर्स बॉलीवूड स्टार्ससाठी सोशल मीडियावर कशी प्रतिक्रिया देतात हे दाखवले आहे. शोचा होस्ट अरबाज खानने सोशल मीडिया युजर्सची एक कॉमेंट वाचली, ज्यात जेनेलियाला 'व्हल्गर आंटी' म्हटले होते.

जेनेलियाबद्दल युजरची विक्षीप्त प्रतिक्रिया

या युजरने जेनेलिया डिसूझाबद्दलच्या अनेक आक्षेपार्ह गोष्टी सांगितल्या. अरबाज खानने या युजरची संपूर्ण कॉमेंट वाचली. ज्यामध्ये लिहिले होते की, "निर्लज्ज, स्वस्त, व्हलगर आंटी नेहमी ओवरएक्टिंग करते, तुमच्या वयाला आणि चेहऱ्याला शोभत नाही, खासकरून जेव्हा तुम्ही विवाहित असता आणि तुम्हाला दोन मुले असतात तेव्हा ... आजीबाई, इतके की मुलेही तुझ्या ओवरएक्टिंगमुळे लाजतात आणि वैतागतात."

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

जेनेलियाचे सडेतोड उत्तर

कॉमेंट ऐकल्यानंतर जेनेलिया म्हणाली, "असं वाटतंय की घरी त्याचा दिवस चांगला जात नाहीय, तो खूपच निराश झाला, भाऊ, आशा करते की तू बरा होशील." जेनेलियाचे उत्तर ऐकल्यानंतर अरबाजने या युजरचे नाव युनिव्हर्स योगा असल्याचे सांगितले.

जेनेलियाने सांगितला रितेश - प्रिती झिंटा भेटीच्या वेळचा किस्सा

याशिवाय, अरबाजने शोमध्ये रितेश-जेनेलियाच्या आयफा अवॉर्ड्स 2019 संबंधीही प्रश्न विचारला, ज्यामध्ये रितेश अभिनेत्री प्रीती झिंटाची गळाभेट घेत होता आणि तेव्हा जेनेलियाची रिएक्शन पाहण्यासारखी होती.

जेनेलियाने सांगितले की ती बऱ्याच दिवसांनी पुरस्कार सोहळ्याला गेली होती. त्यावेळी तिने उंच टाचेचे चप्पल घातले होते. आम्ही उभे असताना सर्वांना अभिवादन करीत होतो, त्यावेळी माझे पाय दुखत होता. नेमकी त्यावेळी कॅमेरामनने माझी रिएक्शन टिपली.

हेही वाचा - सौजन्या आत्महत्या प्रकरण : असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण शोधताहेत पोलीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.