ETV Bharat / sitara

कठीण क्षणातून उठणे यातच खरे धैर्य, पतीच्या सुटकेनंतर म्हणाली शिल्पा शेट्टी

author img

By

Published : Sep 21, 2021, 7:31 PM IST

पती राज कुंद्रा तुरुंगातून परतल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवरुन एक प्रसिध्द संदेश कोट करीत आपले मत मांडले आहे. संकटाला डगमगून न जाता त्यातून पुन्हा भरारी घेतली पाहिजे अशा आशयाचे हे कोट आहे.

शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कुंद्रा पती राज कुंद्राच्या घरी परतण्याने आयुष्य पूर्वपदावर आल्यानंतर मंगळवारी एक प्रेरणादायी संदेश पोस्ट केला. राज कुंद्राची पॉर्नोग्राफिक केसमधून मुंबईतील आर्थर रोड जेलमधून जामीनावर सुटका झाली. शिल्पाने आपल्या इन्स्टाग्रामवर स्वतःच्या फोटोसह चीनी तत्ववेत्ता कन्फुसिएसचा एक प्रसिध्द कोट पोस्ट केला आहे. यात लिहिलंय, "आपले सर्वात महान वैभव कोसळण्यात नसते तर पडल्यानंतर प्रत्येकवेळी पुन्हा उभारी घेण्यात असते."

कॅप्शनमध्ये लिहिलंय, "असे काही क्षण असतात जे तुम्हाला जमिनीवर ढकलतात. अशा वेळी, माझा खरोखर विश्वास आहे की जर तुम्ही सात वेळा पडलात तर स्वतःला आठवेळा परत उभे राहण्यासाठी सक्षम करा."

शिल्पा शेट्टीने पुढे लिहिलंय की, "कठीण क्षणांमध्ये" परत येण्यासाठी खूप धैर्य, इच्छाशक्ती आणि सामर्थ्य लागते. पण, हे गुण तुम्हाला या जीवन प्रवासात अधिक लवचिक आणि मजबूत बनवतील. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही परत उठता, तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा निश्चय आणि प्रेरणा घेऊन परत याल जे अशक्य वाटते ते शक्य आहे."

शिल्पाचा पती कुंद्रा याला मंगळवारी सकाळी 11.30 नंतर आर्थर रोड कारागृहातून सोडण्यात आले, असे तुरुंगातील अधिकाऱ्याने सांगितले. मुख्य महानगर दंडाधिकारी एस. बी. भाजीपाले यांनी 50 हजाराच्या जामीनावर त्याची मुक्तता केली होती.

न्यायालयीन कोठडीत मध्य मुंबईतील आर्थर रोड कारागृहात बंद असलेल्या उद्योजक राज कुंद्राला जुलै महिन्यात अश्लील चित्रपट बनवण्याच्या आणि काही अॅप्सद्वारे प्रकाशित करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

हेही वाचा - अभिनेत्री पायल घोषवर अज्ञातांचा हल्ला, रामदास आठवले भेटीला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.