इंडियन आयडॉल १२ च्या गेल्या भागात नीतू कपूरला पाहुणे म्हणून बोलाविले होते. तो भाग त्यांचे दिवंगत पती ऋषी कपूरला समर्पित होता. शोमध्ये स्पर्धकांनी ऋषी आणि नीतू कपूर यांची गाणी गात ऋषी कपूर यांना सांगीतिक श्रद्धांजली वाहिली. पाहुणे म्हणून आलेल्या नीतू कपूर यांनी काही गोष्टी बिनदिक्कतपणे सांगितल्या ज्या आश्चर्यचकित करणाऱ्या होत्या.
शोचा होस्ट आदित्य नारायण, साहजिकच, ऋषी कपूरच्या अभिनय आणि नृत्याची तारीफ करीत होता तेव्हा नीतू कपूरने त्याला थांबविले आणि सांगितले की,’अतिशय चूक. ऋषी कपूर अजिबात चांगला डान्सर नव्हता. त्याचे ‘लेग वर्क’ एकदम खराब होते. तो गाण्यांत नेहमी चेहरा आणि हाताने कमरेपर्यंतच डान्स करायचा. त्याचे पाय कधीच रिदमवर थिरकले नाहीत. परंतु त्याचे हावभाव आणि हातांची हालचाल इतकी प्रभावी होती की तो त्यानेच पडदा व्यापून टाकायचा आणि लोकांचे त्याच्या पायांकडे दुलक्ष व्हायचे. त्यावेळी गाणीही सुपरहिट होती व दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक अशा काही हालचाली बांधायचे की ऋषी कपूर उत्तम नर्तक म्हणून पेश व्हायचा. ‘एक मैं और एक तू’ हे इतके बेफाट गाजलेले गाणे व त्यातील आमच्या मूव्ह्स इतक्या गाजल्या हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु ते चित्रित होत असताना ऋषी कपूरला साध्या साध्या स्टेप्स करता येत नव्हत्या. गर्मीचा मोसम होता, मी मिनी स्कर्ट आणि बूटसमध्ये होते. आताच्यासारखे वातानुकूलित स्टुडिओज तेव्हा नव्हते. त्यामुळे रिटेक देऊन देऊन मी तर थकले होते. त्यातच ऋषी प्रॅक्टिस करतानाही मी असावे हा आग्रह करीत होता. त्यावेळी माझ्या मनात विचार चमकून गेला की एवढ्या साध्या स्टेप्ससुद्धा याला का जमत नाहीयेत? पण पडद्यावर ऋषी कपूर आपल्या नृत्याने मॅजिक निर्माण करायचा हेही तितकंच खरं.’
ऋषी कपूर अजिबात चांगला डान्सर नव्हता आणि रणबीर अतिशय वाईट गातो : नीतू कपूर! - इंडियन आयडॉल १२मध्ये ऋषी कपूर विशेष
इंडियन आयडॉल १२मध्ये ऋषी कपूर विशेष भागासाठी नीतू कपूर पाहुण्या म्हणून आल्या होत्या. शोचा होस्ट आदित्य नारायण, साहजिकच, ऋषी कपूरच्या अभिनय आणि नृत्याची तारीफ करीत होता तेव्हा नीतू कपूरने त्याला थांबविले आणि म्हणाल्या की ," ऋषी कपूर अजिबात चांगला डान्सर नव्हता. त्याचे ‘लेग वर्क’ एकदम खराब होते. तो गाण्यांत नेहमी चेहरा आणि हाताने कमरेपर्यंतच डान्स करायचा. त्याचे पाय कधीच रिदमवर थिरकले नाहीत." नीतू यांच्या या वक्तव्याने सर्वच चकित झाले.