मुंबई - अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी 'कुली नंबर १' या चित्रपटातील 'तुझको मिर्ची लगी' हे गाणे रिलीज केले आहे. या गाण्याने सर्वांनाच १९९४ मधील मुळ गायक कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या जादुई स्वरांच्या आठवणीची सहल घडवली आहे.
या गाण्यात सर्वांच्या नजरा वरुण धवन आणि सारा अली खानवर रोखलेल्या असतील. त्यांनी गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या तोडीचे नृत्य करण्याचा प्रयत्न केलाय. लालो जॉर्ज - डीजे चतस याने संगीतबध्द केलेले हे गाणे मुळ संगीतकार आनंद-मिलिंद यांनी बनवले होते आणि समीर यांनी याचे बोल लिहिले होते.
मूळ कुली नंबर १ ची गाणी खूप लोकप्रिय
दिग्दर्शक डेव्हिड धवन या चित्रपटाविषयी म्हणाले, "मूळ कुली नंबर १ ची गाणी खूप लोकप्रिय आणि सदाबहार आहेत आणि मला वाटते की या गाण्यांनी या चित्रपटास मदत केली आहे. मी नेहमी स्पष्ट होतो की जर या चित्रपटाचा रिमेक बनला तर या ब्लॉकबस्टर गाण्यांचा उपयोग करेन. मुळ गाणी आनंद मिलींद यांनी संगीतबध्द केली होती. आणि याचे बोल समीर यांनी लिहिले होते. ही गाणी नेहमीच माझ्या ह्रदयाच्या जवळची आहेत. आम्ही नवीन 'कुली नं. १' मध्ये ही गाणी सहभागी करुन एकाचवेळी अनेक कामे साध्य केली आहेत."
हेही वाचा - 'अंतिम' फर्स्ट लूक : सलमान खान भिडला मेव्हणा आयुष शर्मासोबत
'कुली नंबर १' डिसेंबर रोजी २०० देशातील प्राईम मेंबर्सपर्यंत पोहोचणार आहे.
हेही वाचा - 'अतरंगी रे'साठी शाहजहांच्या अवतारात अक्षय कुमार