ETV Bharat / sitara

सुरज पांचोलीचा ‘सॅटलाइट शंकर' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

चित्रपटात सुरजशिवाय मेघा आकाशची महत्त्वाची भूमिका असणार आहे. भूषण कुमार, मुरद खेतानी, क्रिशन कुमार आणि अश्विन वरदे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत

सुरज पांचोली
author img

By

Published : May 1, 2019, 10:11 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुरज पांचोलीने 'हिरो' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याचा हा पहिलाच चित्रपट त्याला विशेष प्रसिद्धी मिळवून देण्यात यशस्वी ठरला नाही. यानंतर आता सुरज ‘सॅटलाइट शंकर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

येत्या ६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून २०१५ मध्ये आलेल्या हिरो चित्रपटानंतर आता तब्बल ४ वर्षांने सुरज बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. निश्चितच या चित्रपटाची त्याचे चाहचे आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सुरज एका लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

चित्रपटात सुरजशिवाय मेघा आकाशची महत्त्वाची भूमिका असणार आहे. भूषण कुमार, मुरद खेतानी, क्रिशन कुमार आणि अश्विन वरदे या चित्रपटाची निर्मिती करत असून विशाल विजय कुमार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर इरफान कमल यांचे दिग्दर्शन आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.