मुंबई - अभिनेत्री रवीना टंडन कोरोना महामारीदरम्यान एका वेब सीरिजचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी तयार आहे. हिमाचल प्रदेशच्या डलहौसीमध्ये हे शूटिंग होणार आहे. सध्या या वेब सीरीजविषयी फारसा खुलासा करण्यात आलेला नाही.
रवीना म्हणाली, "मी पुन्हा एकदा शूटिंग सुरू करण्यासाठी उत्सुक आहे. परंतु, आपण सावध राहणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी कोविड -19 दिशानिर्देश पाळले पाहिजेत. वैयक्तिकरित्या मी कोविड महामारीच्या काळात सुरक्षा आणि स्वच्छतेची काळजी घेते. आमच्या युनिटची संपूर्ण टीम आणि कलाकार सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करतील. "
'केजीएफ: चॅप्टर 2' हा रवीनाचा पुढील चित्रपट आहे. हा कन्नड स्टार यश यांनी अभिनय केलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'केजीएफ: चॅप्टर 1' चा सिस्क्वेल आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.
हेही वाचा - सलमान खानने केक कापून वाजिद खानच्या आठवणींना दिला उजाळा