मुंबई (महाराष्ट्र ) - रश्मिका मंदान्ना तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'पुष्पा : द राइज' चित्रपटाला देशभरातील प्रेक्षकांकडून मिळालेले सर्व प्रेम पाहून भारावून गेली आहे. देशभरातील प्रेक्षक तिच्या आगामी मिशन मजनू आणि गुडबाय या हिंदी चित्रपटांचेही असेच स्वागत करतील अशी तिला आशा वाटते.
नुकतीच चित्रपटसृष्टीत पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या या दाक्षिणात्या अभिनेत्रीने २०१६ मध्ये किरिक पार्टी या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने 'गीता गोविंदम', 'देवदास', 'डियर कॉम्रेड', 'सुलतान' (तमिळ), आणि 'यजमान' (कन्नड) या तेलुगू चित्रपटांमध्ये तिने यशस्वी अभिनय केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती स्पाय-थ्रिलर 'मिशन मजनू' या चित्रपटात काम करीत आहे. तर अमिताभ बच्चन यांच्या 'गुडबाय' या चित्रपटातून तिचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे.
"२०२१ च्या अखेरीस प्रदर्शित झालेला माझा एक चित्रपट होता पुष्पा. दरवर्षी माझा चित्रपट रिलीज होता याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला कोविड-१९ च्या आधी आणि नंतरच्या वर्षांमध्येही माझे चित्रपच हिट ठरले आहेत आणि मला आशा आहे की २०२२ मध्येही हेच सुरू राहील."
हेही वाचा - Tollywood Corona Update : कटप्पा फेम कलाकार सत्यराज यांनाही कोरोनाची लागण
"मला आशा आहे की माझ्याशी संबंधित 'मिशन मजनू' आणि 'गुडबाय' हे हिंदी चित्रपटही चांगले काम करतील. हे दोन चित्रपट घडले याचा मला खूप आनंद आहे. पुष्पा चित्रपटाने वर्षाची समाप्ती मोठ्या प्रमाणात झाली," असे मंदान्ना एका मुलाखतीत म्हणाली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'मिशन मजनू' आणि 'गुडबाय' हे दोन्ही चित्रपट याच वर्षी रिलीज होणार आहेत. तिने तिचा पहिला हिंदी प्रोजेक्ट मिशन मजनू कसा मिळवला याची आठवण करून देताना, खुलासा केला की पहिल्या लॉकडाउन दरम्यान तिला ऑफर आली होती. दोन महिन्यांनंतर, तिला 'गुडबाय' या आणखी एका बॉलिवूड चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले.
"मला 'मिशन मजनू' साठी कॉल आला कारण ते अनुभवी असलेल्या परंतु नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. ते माझ्यापर्यंत पोहोचले. हा एक चित्रपट आहे जो मी केला नसता तर माझा हिंदी चित्रपट झाला नसता. 'मिशन मजनू' हा एक प्रयोग आहे, मला आशा आहे की तो चांगला यशस्वी होईल," असेही ती म्हणाली.
'मिशन मजनू' निश्चित झाल्यानंतर 'गुडबाय' चित्रपटाचीही तिला ऑफर मिळाली. याबद्दल सांगताना मंदान्ना म्हणाली, "मला चित्रपटाबद्दल एका मित्राचा फोन आला आणि त्याने मला इच्छूक आहेस का विचारले. मी स्क्रिप्ट वाचली आणि कथा आवडल्यानंतर मला वाटले की या चित्रपटात सहभागी इतर असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याआधीच मला या चित्रपटाचा भाग व्हायला आवडेल. त्यामुळेच मला हा चित्रपट करण्यास प्रवृत्त केले. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती."
हेही वाचा - Samantha on Oo Antava success: 'ऊं ऊं अंटवा'साठी अल्लू अर्जुनचे सामंथाने मानले आभार