मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आगामी 'गुडबाय' चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे. बिग बी यांच्यासोबत इतक्या कमी काळात काम करण्याची संधी मिळेल असे कधीही वाटले नव्हते, असे मंदान्नाने म्हटले आहे.
'गुडबाय' हा मंदान्नाचा दुसरा बॉलिवूड चित्रपट आहे. आगामी मिशन मजनूमधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
''श्रीयुत बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळत असल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझ्या करियरमध्ये इतक्या लवकर त्यांच्यासोबत काम करायला मिळेल याचा विचारही मी कधी केला नव्हता. त्यांच्यासोबत शूटिंग सुरू होण्याची मी प्रतीक्षा करीत आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणी आणि जमेल तेवढी मज्जा अनुभवण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळेल याची खात्री आहे.'', असे रश्मिका म्हणाली.
रश्मिका म्हणाली की ती खूप नर्व्स आणि उत्साही बनली आहे. ''मी करंच खूप नर्व्हस आणि त्यांच्यासोबत गुडबायच्या सेटवर काम करण्यासाठी उत्साही बनली आहे. ही संधी मला गमवायची नाही आणि याचा जास्तीत जास्त लाभ मी घेईन'', असे ती म्हणाली.
रश्मिकाने 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' या तेलुगू चित्रपटात काम केले आहे. 'मिशन मजनू'मध्ये तिला सिद्धार्थ मल्होत्रासोबत कास्ट करण्यात आले आहे.
चित्रपट निर्माता विकास बहल दिग्दर्शित 'गुडबाय' हा चित्रपट बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट निर्मितीचा आहे.
हेही वाचा - विकी कौशलने केले सॅम माणेकशॉ यांचे जयंती निमित्य स्मरण