मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असेला रश्मी रॉकेट चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज करण्यात आला. गुजरातमधील कच्छच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटातील कथा आहे. वेगवान धावपटू असलेल्या रश्मीला तिच्या खेळाडू बनण्याच्या वाटचालीत आलेल्या खडतर संकटांचा ती कसा सामना करते हे दाखवण्यात आले आहे.
रश्मी रॉकेट सिनेमाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम आभासी पध्दतीने ऑनलाईन पार पडला. यावेळी अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या व्यक्तीरेखेबद्दलची माहिती दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन इरफान खानसोबत कारवाँ बनवलेल्या आकाश खुरानाने केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
फेमिनाइन भूमिकेत तापसी पन्नू
तिच्या आगामी चित्रपट रश्मी रॉकेटमध्ये धावपटूची भूमिका साकारणारी अभिनेत्री तापसी पन्नू गुरुवारी म्हणाली की तिचा चित्रपट स्त्रीप्रधान काय आहे की नाही याबद्दल पुरुषप्रधान विचारांवर प्रश्न विचारण्याचा मार्ग आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रश्मीला (तापसी पन्नू) पुरूष लिंग चाचणीला सामोरे जात असल्याचे दिसून येते. अशी चाचणी महिला खेळाडूंवर केली जाते. यात तिला पारंपरिक स्त्री नसल्यामुळे भेदभावाचा सामना कसा करावा लागतो हे दाखवण्यात आले आहे. अलीकडेच, ट्विटरवर तिचा पाठमोरा असलेल्या फोटोचे पोस्टर रिलीज झाले होते. यावरुन तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला होता. एका युजरने लिहिले होते, "ये मर्द की बॉडीवाली सिर्फ तापसी ही हो सकती है."
-
Heartfelt thank you
— taapsee pannu (@taapsee) September 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
From yours Truly.
But there are many women who actually hear this daily for no fault of theirs.
An ode to all the athletes who give their sweat and blood to the sport and their nation and still get to hear this. #RashmiRocket #AbUdneKaTimeAaGayaHai pic.twitter.com/ASTJ2UdkZc
">Heartfelt thank you
— taapsee pannu (@taapsee) September 24, 2021
From yours Truly.
But there are many women who actually hear this daily for no fault of theirs.
An ode to all the athletes who give their sweat and blood to the sport and their nation and still get to hear this. #RashmiRocket #AbUdneKaTimeAaGayaHai pic.twitter.com/ASTJ2UdkZcHeartfelt thank you
— taapsee pannu (@taapsee) September 24, 2021
From yours Truly.
But there are many women who actually hear this daily for no fault of theirs.
An ode to all the athletes who give their sweat and blood to the sport and their nation and still get to hear this. #RashmiRocket #AbUdneKaTimeAaGayaHai pic.twitter.com/ASTJ2UdkZc
यावर तापसीने युजरला उत्तर देताना लिहिले, ''मी इतकेच म्हणेन..हे वाक्य आठवणीत ठेवा आणि 23 सप्टेंबरपर्यंतची प्रतीक्षा करा.'' अखेर आज ट्रेवर रिलीज झाल्यानंतर तापसीला काय म्हणायचे होते त्याचा उलगडा होताना दिसत आहे.
रश्मी रॉकेट चित्रपटामध्ये सुप्रिया पाठक आणि सुप्रिया पिळगावकर यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाला नेहा आनंद आणि प्रांजल खंडधिया यांच्यासह निर्माता रॉनी स्क्रूवालाच्या बॅनर आरएसव्हीपीने पाठिंबा दिला आहे. हा चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - क्रिकेट खेळतानाचा अमिताभ बच्चन यांचा दुर्मिळ फोटो, म्हणतो, "बॅट छोटी पडली"