मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि त्याची अभिनेत्री पत्नी दीपिका पादुकोण यांनी राजस्थानमध्ये २०२१1 चे स्वागत केले. ही जोडी रणथंभोरच्या जंगलाची भटकंती करीत असून निसर्गाच्या सानिध्यात ते एन्जॉय करीत आहेत. रणवीरने वाघाच्या राखीव अभयारण्यातील चित्तथरारक सूर्योदय दृश्याचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला सेलेब्रिटी आणि चाहत्यांनी दाद दिली आहे.
रणवीरने आपल्या इन्स्टाग्रामवरुन हा फोटो पोस्ट केला असून सुंदर लोकेशन्सवरील हा आपल्या अर्धांगिनीसोबत सुर्योदय पाहतानाचा फोटो चाहत्यांना आवडला आहे.
![Ranveer shares first glimpse of Ranthambore](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10090092_ran.jpg)
योगायोगाने, नवीन वर्ष साजरा करण्यासाठी दीपिका आणि रणवीर देखील त्याच रिसॉर्टला गेले आहेत जिथे लव्हबर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आपापल्या कुटूंबियांसह दाखल झाले होते. मंगळवारी दीपिका आणि रणवीर जयपूर विमानतळावर उतरले आणि थेट रणथंभोरला गेले. त्यानंतर त्यांनी सवाई माधोपूरचा रस्ता धरला.
हेही वाचा - २०२० विचित्र होते, २०२१ साठी कोणताही संकल्प नाही - अमिताभ बच्चन
रणबीर आणि आलिया यांचा नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर साखरपुडा होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र रणबीरचे काका रणधीर कपूर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या बातमीचे खंडन केले होते.
हेही वाचा - प्रभासने चाहत्यांना दिली नव वर्षाची भेट, 'राधेश्याम'चे नवे पोस्टर जारी