हैदराबादः बॉलिवूडच अभिनेता रणवीर सिंगने नुकतेच कोला ब्रँडसाठी तेलगू सुपरस्टार महेश बाबूसोबत शूट केले आहे. महेश बाबूवर रणवीर फिदा झाल्याचे त्याच्या पोस्टवरुन दिसून येते.
रणवीर आणि महेश बाबू एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी एकत्र आले होते. एकत्र काम करण्याच्या अनुभवाबद्दल रणवीर म्हणाला की महेश बाबू हे फायनेस्ट जंटलमन आहेत.
आज सकाळी रणवीरने इन्स्टाग्रामवर सेटवरील महेशबरोबरचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोत ही जोडी शॉट्स दरम्यानचा एक क्षण अनुभवताना दिसत आहेत.
"मला एका फायनेस्ट जंटलमनसोबत सहकार्य करण्याचा बहुमान मिळाला आहे. आमचे परस्पर संवाद नेहमीच समृद्ध होत आहेत. बिग ब्रदर महेश गारू यांना प्रेम व आदर," असे फोटोच्या कॅप्शनमध्ये रणवीरने लिहिलंय.
चित्रपटाच्या आघाडीवर सध्या रणवीर स्पोर्ट्स ड्रामा '83' या चित्रपटात काम करीत आहे. त्याबरोबरच जयेशभाई जोरदार हा चित्रपटही रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. त्याने रोहित शेट्टी यांच्या सर्कस चित्रपटाचे शुटिंग सुरू केले आहे. हा चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या द कॉमेडी ऑफ एररिस या नाटकाचे रूपांतर आहे, ज्यामध्ये रणवीरने दुहेरी भूमिका साकारली आहे.
हेही वाचा -आमिरच्या एक्झीटनंतर, 'विक्रम वेधा'मध्ये झळकणार हृतिक रोशन?
सर्कसमध्ये पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडीज, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव, जॉनी लीव्हर, संजय मिश्रा, व्रजेश हिरजी, विजय पाटकर, सुलभा आर्य, मुकेश तिवारी, अनिल चरणजीत, अश्विनी काळसेकर, आणि मुरली शर्मा यांच्या भूमिका आहेत.
हेही वाचा -भन्साळी, आलिया भट्ट यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ कायदेशीर अडचणीत