ETV Bharat / sitara

जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावले, तर महेश भट्टने फेकली चप्पल - रंगोली चंदेल - Rangoli Chandel alleged that Javed Akhtar and Mahesh Bhatt

कंगना रानावतची बहिण आणि तिची प्रवक्ता रंगोली चंदेलने जावेद अख्तर आणि महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रंगोलीने ट्विट करुन म्हटलंय की, कंगनाने हृतिकची माफी मागावी यासाठी जावेद अख्तर यांनी धमकावले आणि महेश भट्टने चप्पल फेकली होती.

Rangoli Chandel alleged that Javed Akhtar
रंगोली चंदेलचे आरोप
author img

By

Published : Feb 19, 2020, 7:50 PM IST

मुंबई - रंगोली चंदेलने बुधवारी ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर आणि दिग्गज निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रंगोलीने ट्विट करुन म्हटलंय की, कंगनाने ह्रतिकची माफी मागावी यासाठी जावेद अख्तर यांनी धमकावले आणि महेश भट्टने चप्पल फेकली होती.

रंगोलीने ट्विटमध्ये लिहिलंय, ''जावेद अख्तरजीने कंगनाला घरी बोलवले आणि तिला हृतिक रोशची माफी मागण्यास सांगितले आणि धमकावले. जेव्हा कंगनाने सुसाईड बॉम्बरचा रोल करण्यास मनाई केली तेव्हा महेश भट्टने चप्पल फेकली होती. हे लोक पंतप्रधानांना फासीवादी म्हणतात, चाचाजी, तुम्ही दोघे कोण आहात ?''

  • Javed Akhtar ji called Kangana home and intimidated her threatened her to say sorry to Hrithik, Mahesh Bhatt threw chappal on her cos she refused to play a suicide bomber, they call PM Facist, chacha ji aap dono kya ho ? https://t.co/4yfHDK7Jcq

    — Rangoli Chandel (@Rangoli_A) February 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कंगना आणि हृतिक रोशन यांच्यात गेली काही वर्ष बिनसले आहे. हृतिकला तिने एकदा आपला एक्स असल्याचे म्हटले होते. त्याला हृतिकने विरोध केला होता. त्यानंतर हे प्रकरण मीडियात खूप गाजले होते. अधून मधून अजूनही या वादाला हवा देण्याचे काम कंगना आणि तिची बहिण रंगोली करीत असते.

रंगोलीच्या या ट्विटनंतर जावेद अख्तर किंवा महेश भट्ट यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.