ETV Bharat / sitara

रणधीर कपूर यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह, कोकिलाबेन रुग्णालयात दाखल - रणधीर कपूर

निर्माता रणधीर कपूर यांना कोराणाची बाधा झाल्यामुळे त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

Randhir Kapoor's covid test positive
रणधीर कपूर यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह
author img

By

Published : Apr 29, 2021, 8:07 PM IST

मुंबई - बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेता-चित्रपट निर्माता रणधीर कपूर यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, "ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर यांना काल रात्री कोविड -१९ उपचारासाठी मुंबईत कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांची प्रकृती स्थिर आहे."

करिश्मा आणि करिना कपूर यांचे वडिल असलेले रणबीर कपूर रुग्णालयात दाखल झाल्यामुळे कपूर फॅमिलीवर काळजीची छाया आहे. गेल्या वर्षी ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. यावर्षी त्यांचा लहान भाऊ राजीव कपूर यांचेही निधन झाले. रणधीर कपूर लवकर बरे व्हावेत यासाठी बॉलिवूड चाहत्यांमधून प्रार्थना केली जात आहे.

हेही वाचा - 'सत्यमेव जयते २'चे रिलीज आणखी लांबणीवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.