ETV Bharat / sitara

आलियासोबत लग्नाबाबत रणबीरने सोडले मौन, म्हणाला 'ते ध्येय तो लवकरच गाठेल'

२०२० मध्ये जर कोरोनाचे संकट आले नसते तर रणबीर कपूर विवाहित व्यक्ती झाला असता याला त्यानेच दुजोरा दिला आहे. त्याच्या लग्नाच्या प्लॅनबद्दल तो म्हणाला की, ते ध्येय तो लवकरच गाठेल.

Ranbir on marriage with Alia
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट
author img

By

Published : Dec 25, 2020, 12:37 PM IST

मुंबई - अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट विवाहित होणार अशी चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. यावर रणबीर अजूनपर्यंत मौन बाळगून होता. मात्र त्याने लग्नाबाबतचे मौन सोडले असून या चर्चेत तथ्य असल्याचे म्हटले आहे.

रणबीर आणि आलियाचे चाहते ते कधी बोहल्यावर चढतात हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एका वेबलोइडला दिलेल्या मुलाखतीत आलियाने लग्नाविषयी विचारले असता म्हणाली की, ''मी लग्न कधी करणार? प्रत्येकजण मला लग्न कधी करणार असे का विचारत आहे?तुम्हाला माहितीय की मी २५ वर्षांची आहे आणि मला वाटते की आता लग्न करणे हे खूप लवकर होईल."

असे असले तरी रणबीरने आलिया भट्टबरोबर त्याच्या लग्नाच्या अफवा खऱ्या अर्थाने स्वीकारल्या आहेत. जर जगभरात कोरोना साथीची परिस्थिती नसती तर दोघेही लग्न केलेले जोडपे ठरले असते.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरने आपल्या लग्नाच्या अफवांबद्दल बोलताना सांगितले की, "मी काहीही बोलून याला टाळू इच्छित नाही. माझ्या आयुष्यात मी हे ध्येय लवकरच गाठणार आहे.'' मुलाखत व्हायरल होत असून रणबीरने यात पहिल्यांदाच आलियाला आपली गर्लफ्रेंड म्हटले आहे.

रणवीर आलियाबद्दल बोलताना म्हणाला,"तुम्हाला माहित आहे की माझी गर्लफ्रेंड आलिया (भट्ट) एक ओव्हरसिव्हर आहे. गिटारपासून पटकथालेखनापर्यंत तिने प्रत्येक गोष्टीचा ऑनलाइन क्लास तिने घेतला होता. मला नेहमीच तिच्या शेजारी एक अंडरसिव्हर असल्याचे वाटत आहे."

हेही वाचा - माऊंट मेरी चर्चमध्ये नाताळ साजरा, केवळ 50 जणांना प्रवेशाची मुभा

अयान मुखर्जीच्या महत्वाकांक्षी ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत.

हेही वाचा - 2020 वर्षातील सर्वाधिक चर्चिलेले प्रकरण : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.