ETV Bharat / sitara

राजकुमार रावने 'हम दो हमारे दो'मध्ये घेतलेत चक्क "दत्तक"आई वडील - 'Hum Do Humare Do' on Disney Hotstar

राजकुमार रावचा एक अनोखी विनोदी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. एक व्यक्ती आपल्या आई वडिलांना दत्तक घेतो अशी कथा यात दाखवण्यात आली आहे. 'हम दो हमारे दो' असे शीर्षक असलेला हा चित्रपट 29 ऑक्टोबर रोजी डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होईल.

हम दो हमारे दो'
हम दो हमारे दो'
author img

By

Published : Oct 20, 2021, 10:41 PM IST

मुंबई - अभिनेता राजकुमार राव याचा आगामी "हम दो हमरे दो" हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यात तो वेगळ्या प्रकारे विनोदी भूमिका साकारणार आहे. हास्यास्पद परिस्थितीत अडकलेल्या गंभीर माणसाची ही भूमिका आहे. अभिषेक जैन दिग्दर्शित या चित्रपटात राव एक अनाथ व्यक्ती आहे. जो त्याची प्रेयसी क्रिती सॅननसोबत लग्न करण्यासाठी आई वडील दत्तक घेतो.

अभिनेता परेश रावल हे राजकुमारच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत आणि रत्ना पाठकने आईची भूमिका साकारली आहे. राजकुमार राव म्हणाला की हा चित्रपट त्याच्या आधीच्या चित्रपटांपेक्षा वेगळा आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

एका मुलाखतीत राजकुमार राव म्हणाला, 'हा एक वेगळ्या प्रकारचा विनोदी चित्रपट आहे. मी आधी केलेल्या भूमिकांपेक्षा हे वेगळे आहे. माझे पात्र अशा व्यक्तीचे आहे, जो नेहमी काही ना काही संकटात सापडतो. हे 'स्त्री', 'लुडो' किंवा 'बरेली की बर्फी' मध्ये साकारलेल्या पात्रासारखे नाही.

37 वर्षीय राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता म्हणाला की तो अशा माणसाची भूमिका करतो जो आरामदायक राहण्याचा प्रयत्न करतो परंतु नेहमीच त्याला विचित्र आणि मजेदार परिस्थितीला सामोरे जावे लागते. 'हम दो हमारे दो' 29 ऑक्टोबर रोजी डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होईल.

हम दो हमारे दो'
हम दो हमारे दो'

राजकुमारने सांगितले की याची कथा अनोखी असल्यामुळे चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. एक व्यक्ती आपल्या आई वडिलांना दत्तक घेतो अशी कथा यापूर्वी लिहिली गेली नव्हती, असेही तो म्हणाला.

हेही वाचा - मराठी भाषेतील 'बाहुबली' चित्रपट ‘शेमारू मराठीबाणा' वाहिनीवर प्रक्षेपित होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.