ETV Bharat / sitara

राजकुमारनं किंग खानसोबत 'छय्यां छय्यां' गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हिडिओ

या गाण्यातील मलायका आणि शाहरूखचा डान्स सर्वांनाच थिरकायला भाग पाडणारा आहे. हा मोह आता बॉलिवूडच्या राजकुमारलाही आवारला नाही

author img

By

Published : Apr 14, 2019, 3:43 PM IST

राजकुमारनं किंग खानसोबत 'छय्यां छय्यां' गाण्यावर धरला ठेका

मुंबई - 'दिल से' या १९९८ मध्ये आलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. शाहरूख आणि मनीषा कोयरालाच्या जोडीलाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र, हा चित्रपट विशेष चर्चेत राहिला तो 'छय्यां छय्यां' या गाण्यामुळे. चित्रपटातील हे गाणं आजही अनेकांच्या ओठांवर आहे.

या गाण्यातील मलायका आणि शाहरूखचा डान्स सर्वांनाच थिरकायला भाग पाडणारा आहे. हा मोह आता बॉलिवूडच्या राजकुमारलाही आवारला नाही. अभिनेता राजकुमार रावने शाहरूखसोबत या गाण्यावर ठेका धरला आहे. फिल्मफेअर २०१९ च्या अॅवॉर्ड शोमध्ये दोघेही या गाण्यावर थिरकले.

हा व्हिडिओ राजकुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. माझ्यासाठी नेहमीच आदर्श असणाऱ्या शाहरूखसोबत आज डान्स करण्याची संधी मिळाली, असं कॅप्शनही त्याने या व्हिडिओला दिले आहे. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यासाठी परिश्रम करा, ते नक्कीच पूर्ण होतील, असेही राजकुमारने पुढे म्हटले आहे.

Intro:Body:

DUMMY

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.