शिर्डी (अहिल्यानगर) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांचा आणि पायाभरणीचा धडाका सरकारकडून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन पद्धतीनं राज्यातील विविध विकासकामांचं उद्घाटन केलं आहे. नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध कामांचं आणि शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील नवीन टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन केलं. तसेच नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनदेखील केलं.
एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 900 ने वाढ : केंद्र सरकारनं नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली होती. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 900 ने वाढ होणार आहे. एकूण 35 महाविद्यालयात प्रतिवर्ष 4850 एमबीबीएस जागा उपलब्ध होणार आहेत. एकाच शैक्षणिक वर्षात मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ (ठाणे) अशा 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयांमुळं ग्रामीण व दूरस्थ भागात विशेषोपचार आरोग्यसेवेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.
Speaking at the launch of projects in Maharashtra, which will enhance infrastructure, boost connectivity and empower the youth.https://t.co/ZYiXGdRFDC
— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2024
10 वैद्यकीय महाविद्यालयांची भेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आज महाराष्ट्राला 10 वैद्यकीय महाविद्यालयांची भेट मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूरच्या अपग्रेडेशन आणि शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणीही करण्यात आली आहे. राज्यात मेट्रोचा विस्तार केला जात आहे. विमानतळांचे अपग्रेडेशन केले जात आहे. राज्यात पायाभूत सुविधा, सौरऊर्जा आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध योजना सुरू केल्या जात आहेत. सर्वात मोठ्या कंटेनर बंदराची पायाभरणी झाली आहे."
नागपूर विमानतळाचा विस्तार : नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची अंदाजित किंमत अंदाजे 7000 कोटी रुपये आहे. सर्व आकारांच्या विमानांसाठी योग्य स्वतंत्र संचालनासह दोन समांतर धावपट्टी, विद्यमान धावपट्टीचे विस्तारीकरण आणि नवीन धावपट्टीचे निर्माण, दरवर्षी 14 दशलक्ष प्रवाशांच्या हाताळणीसाठी 3 लाख चौ. मी. च्या नवीन टर्मिनल इमारतीचा विकास, अंदाजे 9 लाख मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन कार्गो कॉम्प्लेक्सचा विकास करण्यात येणार आहे. एका वेळी सुमारे 100 विमाने सामावून घेण्यासाठी पार्किंग बे करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुखोई फायटर हे लढाऊ विमान लवकरच झेप घेणार !#Shivsena #Eknathshinde pic.twitter.com/6dnfZhOiZR
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) October 9, 2024
शिर्डी विमानतळाचा विस्तार : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन एकीकृत टर्मिनल इमारत उभारणीसाठी 645 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे प्रवाशांना सुखद अनुभव मिळणार आहे. प्रवासी घेऊन जाण्याच्या क्षमतेमध्ये वाढ आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. विस्तारित टर्मिनल इमारतीमुळे शिर्डीमधील स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.
हेही वाचा -