ETV Bharat / entertainment

'भूल भुलैया 3' च्या ट्रेलर लॉन्चसाठी जाणाऱ्या कार्तिक आर्यनला इकॉनॉमिक क्लासमध्ये फॅन्सनी घेरलं - BHOOL BHULAIYAA 3

Bhool Bhulaiyaa 3 trailer : 'भूल भुलैया 3' च्या ट्रेलर लॉन्चसाठी कार्तिक आर्यन जयपूरला जात असताना त्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये चाहत्यांनी घेरलं.

Karthik Aaryan
इकॉनॉमिक क्लासमध्ये कार्तिक आर्यन ((ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 9, 2024, 12:16 PM IST

मुंबई - कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या 'भूल भुलैया 3' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च होणार आहे. यासाठी कार्तिक जयपूरला विमानातून इकॉनॉमिक क्लासमधून रवाना झाला. त्याच्याबरोबर निर्माता भूषण कुमार देखील जयपूरला गेले आहेत. दोघे जेव्हा विमानात चढले तेव्हा चाहत्यांनी त्याला घेरल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

फ्लाइटमधील कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, तो टी-सीरीजचे प्रमुख भूषण कुमार यांच्याबरोबर दिसत आहे. दरम्यान, कार्तिक आर्यन चाहत्यांनी घेरलेला दिसत आहे. कार्तिकबरोबर सेल्फी काढण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. चाहत्यांना निराश न करता, कार्तिक त्यांच्याबरोबर अथकपणे सेल्फी काढताना दिसला.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये, जेव्हा तो फ्लाइटच्या आत आपली जागा घेण्यासाठी रांगेत उभा असलेला दिसतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. तो लोकांशी बोलताना दिसत होता. कार्तिक आर्यनच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तो नेहमीप्रमाणेच मस्त दिसत होता. 'रुह बाबा' ने कॅज्युअल ड्रेस परिधान केला होता. कॅप आणि सनग्लासेससह त्यानं आपला लूक पूर्ण केला.

'भूल भुलैया 3' चा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम 9 ऑक्टोबर 2024 रोजी जयपूर, राजस्थान येथे होणार आहे. माहितीनुसार, निर्माते जयपूरमधील राज मंदिरात चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करणार आहेत. यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित राहणार आहे.

अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 3' मध्ये कार्तिक आर्यनबरोबर तृप्ती डिमरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय राजपाल यादव, राजेश शर्मा असे अनेक स्टार कलाकार आहेत. 2024 च्या दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात विद्या बालननंही पुनरागमन केलं आहे. 2007 मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपटात तिनं 'मंजुलिका'ची भूमिका साकारली होती. निर्मात्यांनी यापूर्वी 'भूल भुलैया 3' चा टीझर रिलीज केला होता, ज्यामध्ये विद्या बालनचे पुनरागमन होते.

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालं तर, 'भूल भुलैया 3' व्यतिरिक्त, कार्तिककडे 'कॅप्टन इंडिया' हा चित्रपट देखील आहे. याआधी तो 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.