हैदराबाद NOBEL PRIZE IN PHYSICS : 2024 चा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा हा पुरस्कार AIचे (artifical Intelligence) गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे जेफ्री ई. हिंटन आणि अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन जे. होपफिल्ड यांना जाहीर करण्यात आला आहे. कृत्रिम न्यूरॉन्सवर आधारित मशीन लर्निंगशी संबंधित नवीन तंत्र विकसित केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कृत्रिम न्यूरल नेटवर्क विकसित : या शोधानं कृत्रिम न्यूरल नेटवर्कच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हॉपफिल्ड यांनी त्यांच्या संशोधनात भौतिकशास्त्रातील तत्त्वांचा वापर करून कृत्रिम न्यूरल नेटवर्क विकसित केलं आहे. त्यांच्या शोधामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात नवीन संधी खुल्या झाल्या आहेत. आज त्याचा विविध क्षेत्रात उपयोग होत आहे.
BREAKING NEWS
— The Nobel Prize (@NobelPrize) October 8, 2024
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2024 #NobelPrize in Physics to John J. Hopfield and Geoffrey E. Hinton “for foundational discoveries and inventions that enable machine learning with artificial neural networks.” pic.twitter.com/94LT8opG79
बोल्टझमन मशीनचा शोध : जेफ्री ई. हिंटन यांनी बोल्टझमन मशीनचा शोध लावला, जो डेटामधील नमुने ओळखण्यास सक्षम आहे. या शोधामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचे प्रयोग विविध क्षेत्रात होत आहेत. हिंटन यांनी त्यांच्या संशोधनात सांख्यिकीय भौतिकशास्त्राच्या तत्त्वांचा वापर करून आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क विकसित केलं आहे.
कोण आहेत हे दोन शास्त्रज्ञ? : शिकागो, यूएसए येथे 1933 मध्ये जन्मलेल्या होपफिल्ड यांनी 1958 मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून पीएचडी केलीय. तेव्हापासून ते न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन विद्यापीठात प्राध्यापक आहेत. जेफ्री ई. हिंटन यांचा जन्म 1947 मध्ये लंडनमध्ये झाला. 1978 मध्ये त्यांनी एडिनबर्ग विद्यापीठातून पीएचडी केली. सध्या कॅनडातील टोरंटो विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून काम करताय.
हे वाचलंत का :