अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा याला 19 जुलै 2021 रोजी रात्री अटक करण्यात आली. त्याच्यावर अश्लिल चित्रपट बनवण्याचा आणि काही अॅप्सवर अपलोड करण्याचा आरोप आहे. राज कुंद्राला अटक करण्यापूर्वी काही तास अगोदर त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या होत्या. त्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्याने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्याने म्हटले होते, ''रस्त्यातील अडथळा तात्पुरता आहे! कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही!''
-
Road blocks are temporary! Nothing can stop you! #mondaymotivation #rajmantra #quote #gratitude https://t.co/crRKcScuIG
— Raj Kundra (@TheRajKundra) July 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Road blocks are temporary! Nothing can stop you! #mondaymotivation #rajmantra #quote #gratitude https://t.co/crRKcScuIG
— Raj Kundra (@TheRajKundra) July 19, 2021Road blocks are temporary! Nothing can stop you! #mondaymotivation #rajmantra #quote #gratitude https://t.co/crRKcScuIG
— Raj Kundra (@TheRajKundra) July 19, 2021
राज कुंद्राने वरील पोस्ट लिहिल्यानंतर त्यासोबत काही हॅशटॅग वापरले होते. त्यात मंडे मोटीव्हेशन, राजमंत्र, कोट, ग्रॅटीट्यूड अशा शब्दांचा वापर केला होता. त्यासोबतच त्याने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
व्हिडिओमध्ये राज कुंद्रा जेम्स बाँडच्या भूमिकेत दिसत आहे. खरं तर व्हिडिओ जेम्स बाँड सिरीजचा आहे, ज्याचे एडिट करण्यात आले आहे. जेम्स बाँडच्या जागी राज कुंद्राचा चेहरा दिसतो आणि तो टँकर चालवताना दिसतो. व्हिडीओ खूप मजेदार असला, तरी चाहत्यांनी त्याच्या अटकेनंतर भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजने व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, ''रस्त्यातील अडथळा तात्पुरता आहे! कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही! #mondaymotivation #rajmantra #quote #gratitude. " याच व्हिडिओवर राज कुंद्राला खूप ट्रोल केले गेले आहे.
हेही वाचा - लेहेंगा-चोली दागिन्यांसह वधूच्या पोशाखात पुश-अप