मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात जेलमध्ये टाकण्यात ( Raj Kundra arrested in pornography case ) आलं होतं. आता तो बेलवर असून नुकतेच त्याने एक स्टेटमेंट रुजू ( Statement of Raj Kundra) केले आहे. राज कुंद्राने पॉर्न सामग्रीच्या निर्मिती किंवा वितरणाशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी फेटाळून ( Raj Kundra denied all the allegations) लावल्या आहेत. राज यांना मुंबई पोलिसांनी जुलैमध्ये अटक केली होती आणि सप्टेंबरमध्ये जामीन मंजूर केला होता. अलीकडेच राज कुंद्राच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण दिले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कुंद्राचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्याविरोधात कुंद्रा यांनी २५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या आपल्या याचिकेत राज कुंद्रा यांनी म्हटले होते की, त्यांनी बनवलेले व्हिडीओ नक्कीच कामुक आहेत, पण त्यामध्ये कोणतीही शारीरिक किंवा लैंगिक क्रिया दाखवलेली नाही. तो पुढे म्हणाला की तो कोणताही अश्लील व्हिडिओ बनवण्यात किंवा प्रसारित करण्यात गुंतलेला नाही आणि त्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे.
आजच राज कुंद्राने स्टेटमेंट जारी केले ( Statement of Raj Kundra) आहे ज्यात त्यांनी त्याच्यावर लावलेल्या सर्वच आरोपांचा इन्कार केला आहे. राज कुंद्रा व्यक्त होत म्हणाला की, “मी कधीही पोर्नोग्राफिक फिल्म्स बनविल्या नाहीयेत वा माझा त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीचा संबंध नाही. दुर्दैवाने मीडिया आणि माझ्या कुटुंबीयांनी मला आधीच दोषी मानलं आणि हे खूप क्लेशदायक आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्णतः विश्वास आहे आणि मी निर्दोष सुटेन याची मला खात्री आहे. हा एक ‘विच हंट’ चा प्रकार असून माझी नाहक बदनामी केली गेली आहे. मला आशा आहे की सत्याचा विजय होईल.”
राज पुढे म्हणतो की, “माझ्याबद्दल अनेक खोटी आणि बेजबाबदार विधाने केली गेली तसेच अनेक बिडबुडाचे आरोप लावत रिपोर्ट्स बनविले गेले. मी शांत राहणे पसंत केलं. परंतु मी गप्प होतो याचा अर्थ मी कमकुवत आहे असे वाटले असेल, कदाचित. मी खोट्या केस मध्ये अडकवलो गेलोय. माझ्या मानवी आणि घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन झाले आहे, त्यामुळे मला प्रचंड त्रास आणि वेदना होताहेत. समाज माध्यमांवरील ट्रोलिंग नकारात्मकता फैलावण्यास मदत करतेय आणि त्यामुळे माझ्याबाबतीत विषारी जनमत बनत चालले आहे."
“माझा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे माझ्या ‘प्रायव्हसीचा’ अवमान करू नका. मी लाजेने माझा चेहरा लपवत नाहीये. पण सततच्या या मीडिया ट्रायलमुळे माझ्या गोपनीयतेमध्ये घुसखोरी होऊ नये असे मला वाटत आहे. माझे प्राधान्य नेहमीच माझे कुटुंब राहिले आहे, यावेळी इतर कशालाही महत्त्व नाही”, असे उद्विग्न राज कुंद्रा म्हणाला.
हेही वाचा - ED summoned Aishwarya : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ईडीच्या कार्यालयात दाखल, ईडीने बजावले होते समन्स