मुंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणांमध्ये शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यवसायिक राज कुंद्रा अटकेत आहेत. प्रकरणातील एका फरार आरोपीने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या प्रकरणातला फरार आरोपी यश ठाकूर यान असा दावा केला आहे की, राज कुंद्रा यांने अटकेपासून बचाव व्हावा यासाठी क्राइम ब्रांचला 25 लाखाची लाच दिली आहे. दरम्यान तो असेही म्हणाला की माझ्याकडे सुद्धा मुंबई पोलिसांनी लाच मागितली होती. यश ठाकूर याने केलेल्या या दाव्यानंतर पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यश ठाकूर यानं दावा केला आहे की या प्रकरणाची तक्रार त्याने अँटी करप्शन ब्युरो कडे दिली होती. या तक्रारीचा एक मेल त्यानं ACB ला पाठवला होता. या मेलमध्ये ठाकूर याने असं म्हटलं आहे की क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी राज कुंद्रा कडून 25 लाख रुपयांची लाच घेतली आहे. यश ठाकूर याच्या म्हणण्यानुसार हा मेल अँटी करप्शन ब्युरोने पुढील कारवाईसाठी मुंबई पोलीस कमिशनर कडे पाठवला आहे.
हेही वाचा - 'तारक मेहता'तील 'रीटा रिपोर्टर' ब्रा पट्टी दिसल्यामुळे झाली ट्रोल, युजर्सनी केल्या घाणेरड्या कॉमेंट्स