मुंबई - रविवारी इरफान खानची भूमिका असलेला अंग्रेजी मीडियम सिनेमा टीव्हीवर दाखवला गेला. यानंतर राधिक मदनने या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी घालवलेल्या क्षणांची आठवण सांगत इरफानसाठी एक भावनिक मेसेज पोस्ट केला. या सिनेमात इरफानने राधिकाच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
राधिकाने या सिनेमाच्या शूटींगच्या वेळचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत इरफानने राधिकाला मिठी मारली असून तो तिच्या कपाळावर किस करत आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये राधिकानं लिहिलं, 'मी तुझी मुलगी आहे'. या सिनेमात इरफान आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेत असल्याचं दाखवलं गेलं आहे.
एप्रिलमध्ये इरफानच्या निधनानंतरही राधिकानं एक पोस्ट शेअर केली होती. यात ती म्हणाली होती, मी आजपर्यंत पाहिलेल्या व्यक्तींमध्ये इरफान सर्वात स्ट्राँग होता. मी स्वतःला भाग्यवान समजते की आयुष्यात तुझ्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तू अनेकांसाठी प्रेरणा होता आणि नेहमी राहशील, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं. इरफानने मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता.