मुंबई - प्रभास आणि पूजा हेगडे यांची भूमिका असलेला राधे श्याम चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज केला आहे. चित्रपट जगभर रिलीजसाठी सज्ज असताना निर्मात्यांनी प्रमोशनसाठी पुन्हा एक ट्रेलर जारी केला. राधे श्यामच्या ट्रेलरवरून हे जवळजवळ निश्चित झाले आहे की चित्रपटात कोणताही विलक्षण खलनायक नाही, परंतु निसर्ग स्वतःच या जोडप्याच्या मिलनासाठी अडथळा बनतो. त्सुनामीची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचा शेवट दु:खद होणार असल्याचीही चर्चा आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
राधे श्याम या चित्रपटाचे निवेदन अमिताभ करणार आहेत. अमिताभ त्याच्या आयकॉनिक भारदस्त आवाजामुळे चित्रपट अधिक परिणामकारक बनेल असा विश्वास निर्मात्यांना वाटतो.
राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित बहु-भाषिक चित्रपट 'राध्ये श्याम'ची प्रेमकथा 1970 च्या दशकात युरोपमध्ये रचली गेली आहे. यामध्ये प्रभास एका हस्तरेखा जाणकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. राधे श्याम तेलगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. राधे श्याम हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - रणबीर श्रध्दा अभिनीत लव रंजनाच्या सिनेमाला मिळाली नवीन रिलीज डेट