मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉनने आपल्या 'राब्ता' या चित्रपटाला आज चार वर्ष पूर्ण झाल्याने एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. तिचा को-स्टार सुशांत सिंह राजपूत याची आठवण ठेवताना ती म्हणाली की 'राब्ता' नेहमीच तिच्या मनाच्या अगदी जवळ राहील.
कृती आणि सुशांत ही जोडी जून २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राब्ता’ या पुनर्जन्मावर आधारित चित्रपटात एकत्र दिसली होती. दोघे डेट करीत असल्याच्या अफवा त्या काळात पसरल्या होत्या. त्यानंतर ते वेगळे झाल्याचीही चर्चा रंगली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'राब्ता'च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त कृतीने सोशल मीडियावर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुशांतसोबत शेअर केलेल्या काही सुंदर क्षणांचा एक व्हिडिओ शेअर केला. 'राब्ता'च्या गाण्यातील सुरवातीचे बोल कृतीने लिहिलेत, "तन लडे, तन मुक जाये ... रुह जुडे, जुडी रह जाएं ...
कृतीने राब्ताच्या निमित्ताने सुशांतच्या आठवणी जागवला. तिने लिहिलंय, "राब्ता हा माझा सर्वात चांगला आणि अविस्मरणीय अनुभव होता आणि तो कायमच माझ्या हृदयाच्या अगदी जवळ राहील .. मला माहित नव्हतं की हा आमचा पहिला आणि शेवटचा असेल ..."
कृती आणि सुशांतने कधीही त्यांच्या नात्यातील बातमीला दुजोरा दिला नव्हता. गेल्या वर्षी १४ जूनला सुशांत मुंबईत मृत अवस्थेत आढळला होता. तो ३४ वर्षांचा होते. त्यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआय, एनसीबी आणि ईडी करत आहेत.
कृती आता 'मिमी' आणि 'बच्चन पांडे'च्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. वरुण धवनसोबत जोडी असलेल्या तिच्या ‘भेडिया’ या आगामी चित्रपटाच्या शूटची सुरुवात तिने केली आहे.
हेही वाचा - विक्की आणि कॅटरिना 'प्रेमीयुगुल', हर्षवर्धन कपूरने दिला दुजोरा