मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूद या दिवसांत प्रवासी कामगारांना मदत करण्यासाठी आपले तन, मन, धन आर्पित करून काम करीत आहे. याचे सर्व स्तरावर कौतुक होत असताना दिसते. यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही सोनूचे खूप कौतुक केले आहे. त्याला उत्तर म्हणून सोनूनेही त्यांना एक वचन दिले आहे.
-
Thank you so much for your kind words sir. You have always a been an inspiration for me. I promise to make our our fellow punjabis proud. 🙏 https://t.co/2R9dpS0zGW
— sonu sood (@SonuSood) May 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you so much for your kind words sir. You have always a been an inspiration for me. I promise to make our our fellow punjabis proud. 🙏 https://t.co/2R9dpS0zGW
— sonu sood (@SonuSood) May 28, 2020Thank you so much for your kind words sir. You have always a been an inspiration for me. I promise to make our our fellow punjabis proud. 🙏 https://t.co/2R9dpS0zGW
— sonu sood (@SonuSood) May 28, 2020
सीएम अमरिंदर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ''माझे पंजाबी सहकारी संकटाच्या या काळात लोकांची भरभरून मदत करीत आहेत याचा अभिमान वाटतो आणि सध्याच्या काळात आमच्या मोगाचा मुलगा सोनू सूद तत्परतेने, प्रवासी कामगारांसाठी अन्न व वाहतुकीच्या व्यवस्थेत गुंतला आहे. खूप छान सोनू! ”. सोनूनेही याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ''तुमच्या दयाळू शब्दांबद्दल धन्यवाद सर. तुम्ही माझे प्रेरणास्रोत आहात. मी वचन देतो की मी माझ्या पंजाबी सहकाऱ्यांबद्दलचा अभिमान कायम राखेन.''
-
आपके संदेश हमें इस रफ़्तार से मिल रहें हैं। मैं और मेरी टीम पूरी कोशिश कर रहें हैं हर किसी को मदद पहुँचे! लेकिन अगर इस में हम कुछ मेसजेज़ को मिस कर दें, उसके लिए मुझे क्षमा कीजिएगा 🙏 pic.twitter.com/wS7vVk9bjv
— sonu sood (@SonuSood) May 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आपके संदेश हमें इस रफ़्तार से मिल रहें हैं। मैं और मेरी टीम पूरी कोशिश कर रहें हैं हर किसी को मदद पहुँचे! लेकिन अगर इस में हम कुछ मेसजेज़ को मिस कर दें, उसके लिए मुझे क्षमा कीजिएगा 🙏 pic.twitter.com/wS7vVk9bjv
— sonu sood (@SonuSood) May 27, 2020आपके संदेश हमें इस रफ़्तार से मिल रहें हैं। मैं और मेरी टीम पूरी कोशिश कर रहें हैं हर किसी को मदद पहुँचे! लेकिन अगर इस में हम कुछ मेसजेज़ को मिस कर दें, उसके लिए मुझे क्षमा कीजिएगा 🙏 pic.twitter.com/wS7vVk9bjv
— sonu sood (@SonuSood) May 27, 2020
सोनू हा पंजाबच्या मोगा येथील मूळ रहिवासी आहे. पंजाबी गुरुद्वारांमध्ये तो सेवेसाठी लंगरही लावत असतो. परंतु, जी कामे सरकार करू शकत नाहीत, ते एकट्या सोनूने करण्यास सुरुवात केली आहे. कामात जर कसर राहिली असेल तर त्याबद्दल सोनूने लोकांची माफीही मागितली आहे. त्याने लिहिलंय, ''मदतीसाठी तुमचे संदेश मला वेगाने मिळत आहेत. प्रत्येकापर्यंत मदत पोहोचेल, यासाठी मी आणि माझी टीम पूर्ण दक्ष राहून प्रयत्न करीत आहोत. यातून काही मेसेजेस जर आमच्याकडून सुटत असतील तर माफ करा.''
सोनू सूद मजुरांची ज्या प्रकारे सेवा आणि मदत करीत आहे त्यामुळे सोशल मीडियावरुन त्याचे भरपूर कौतुक होत आहे. लोक त्याला खरा कोरोना वॉरियर म्हणत आहेत.