ETV Bharat / sitara

Ekta Kapoor COVID 19 Positive : एकता कपूरला कोरोनाची लागण, बॉलिवूड स्टार्सना कोरोनाचा विळखा - Ekta Kapoor COVID 19 Positive,

एकता कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळली आहे. अहवाल आल्यानंतर ती तातडीने क्वारंटाईनमध्ये रहात आहे. एकताने तिच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

एकता कपूर फोटो इन्स्टाग्रामच्या सौजन्याने

author img

By

Published : Jan 3, 2022, 3:33 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर सातत्याने वाढत आहे. दररोज कोणीतरी सेलिब्रिटी कोविड-19 पॉझिटिव्ह ( COVID 19 in Bollywood ) असल्याच्या बातम्या झळकत आहेत. आता या यादीत दिग्दर्शक-निर्माती एकता कपूरचे नावही सामील झाले आहे. एकता कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळली ( Ekta Kapoor COVID 19 Positive ) आहे. अहवाल आल्यानंतर ती तातडीने क्वारंटाईनमध्ये रहात आहे. एकताने तिच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

एकता कपूरची बातमी येत असतानाच जॉन अब्राहमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असल्याचे त्याने कळवले आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम ( John Abraham Corona Positive ) आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल ( Priya Runchal Test Positive For COVID-19 ) यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघेही पॉझिटिव्ह असल्याची माहिती खुद्द जॉन अब्राहमने दिली आहे. जॉनच्या म्हणण्यानुसार, त्याने आणि त्याच्या पत्नीने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पण सध्या दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. दोघांमध्येही कोरोनाची संसर्गाची सौम्य लक्षणे आढळली आहेत.

बॉलिवूड कलाकार कोरोनाच्या विळख्यात

एकता आणि जॉन अब्राहमच्या आधी डिसेंबरमध्ये इतर अनेक सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण झाली आहे. करीना कपूर, अमृता अरोरा, अर्जुन कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर, करण बुलानी, मृणाल ठाकूर कोरोनाच्या विळख्यात आहेत. ख्रिसमसच्या आधी करीना आणि अमृता कोरोना निगेटिव्ह आल्या होत्या. अर्जुन कपूर दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा -John Abraham And Priya Positive : अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियाला कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.