मुंबई - प्रियंका चोप्रा आणि निक जोनास नेहमी रोमँटिक मुडमध्ये दिसत असतात. कधी तो बिचवर रोमान्स करताना आढळतात तर कार चालताना दिसतात. अशातच त्यांचा कालचा रविवार अतिशय रोमँटिक गेला. प्रियंका आणि निकने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. यात ते घोडेस्वारी करताना दिसत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रियंका आणि निकचा हा घोड्यावरील रपेट करतानाचा फोटो खूप पाहिला जात आहे. असंख्य चाहत्यांनी त्यावर कॉमेंट्सही केल्या आहेत. अत्यंत सुंदर लोकेशनस्वर त्यांनी ही फोटोग्राफी केलीय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
निक जोनासने अलिकडेच 'द व्हॉईस' या रियॅलिटी शोचे परिक्षक म्हणून काम सुरू केलंय. या शोमध्ये त्याने प्रियंका आणि त्याच्यात असलेल्या वयाच्या फरकाचीही चर्चा केली होती. एका प्रश्नाच्या उत्तरवार तो म्हणाला होता की, 'माझी बायको ३७ वर्षांची आहे आणि ती खूप कुल आहे.'