मुंबई - प्रियंका चोप्राने यावेळचा विकेंड आपल्या प्रिय व्यक्तींच्या सानिध्यात घालवला. यासाठी तिने नताशा आणि अदार पूनावाला यांचे तिने आभार मानले आहेत.
प्रियंका चोप्राने आपल्या इन्स्टचाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ''जेव्हा विकेंड लिट आणि चिल दोन्ही होतो तेव्हा मला खूप आवडते. नताशा आणि अदार पूनावाला, तुम्ही केलेल्या यजमानाबद्दल खूप आभार. पुढीलवेळी पुन्हा भेटू.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
फोटोमध्ये प्रियंकाच्यासोबत पती निक जोनास, आई मधु चोप्रा, नताशा आणि अदार पुनावाला दिसत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रियंका आणि निक भारतात होळी साजरी करण्यासाठी आले होते. दोघांच्या एकत्र मस्तीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
प्रियंकाला अलिकडेच रिलीज झालेल्या 'द स्काई इज़ पिंक' या चित्रपटात आपण पाहिले होते. सध्या ती 'द व्हाइट टाइगर', 'द मॅट्रिक्स 4' या चित्रपटात काम करीत आहे.