मुंबई - लॉकडाऊनच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्म्सना सुगीचे दिवस आले. कोरोनामुळे सिनेमागृह बंद असल्यामुळे अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज होऊ लागले आणि प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाचा खजिना सापडला. काही महिन्यांपूर्वी देशातील काही राज्यांमध्ये आणि आता 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृहे सुरु झाली. असे असले तरी डिजिटल प्लॅटफॉर्म्सची महती कमी झालेली नाही आणि त्यामुळेच थिएटर आणि ओटीटी हातात हात घालून चालत असताना दिसताहेत. त्याच अनुषंगाने अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि यशराज फिल्म्स एकत्र आले असून यशराज फिल्म्सच्या 4 बिग बजेट चित्रपटांचे एक्सक्ल्यूझिव्ह स्ट्रीमिंग राईट्स प्राईम व्हिडिओला मिळाले आहेत. यात 'बंटी और बबली 2’, 'शमशेरा', 'पृथ्वीराज' आणि 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटांचा समावेश असणार आहे.
प्राइम व्हिडिओवर आधीपासून काही यशराज फिल्म्स (YRF) क्लासिक्स आहेत. ज्यामध्ये डर, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, सिलसिला, चांदनी, दिल तो पागल है अशा एकाहून एक उत्तम चित्रपट असून त्यात अलीकडेच, ठग्स ऑफ हिंदोस्तान, युद्ध, मर्दानी अशा इतर अनेक टायटल्सची भर पडली आहे. तसेच जगभरातील डिजिटल प्रीमियरला प्रेक्षकांकडून खूप कौतुक आणि प्रेम मिळाले आहे.
नुकतेच प्राईम व्हिडिओ इंडियाने भारतातील सर्वात मोठे प्रॉडक्शन हाऊस यशराज फिल्म्स (वायआरएफ) बरोबर एक विशेष करार केला असून याद्वारे स्टुडिओच्या चार मोठ्या आगामी थिएटर रिलीज चित्रपटांसाठी स्ट्रीमिंग सेवा प्रदान करणार आहे. या कराराचा एक भाग म्हणून प्राईम व्हिडिओकडे यशराज बॅनरखाली असलेल्या चार बहुप्रतीक्षित टाइटल्सचे विशेष जागतिक स्ट्रिमिंग अधिकार असतील. प्रेक्षकांना त्यांच्या घरात सुरक्षित आणि आपल्या सुविधांनुसार सर्वोत्कृष्ट चित्रपटांची अखंड सेवा देण्याच्या वचनबद्धतेनुसार हे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चार आठवड्यांनी प्रसारित करण्याचा निर्णय प्राईम व्हिडिओ इंडियाने घेतला आहे.
या यादीत सर्व प्रकारच्या शैलीतील चित्रपटांचा समावेश आहे. त्यात सैफ अली खान, रानी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी, आणि शर्वरी वाघ अभिनित बहुप्रतिक्षित 'बंटी और बबली २’, रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त यांचा मेगा अॅक्शन एंटरटेनर 'शमशेरा', अक्षय कुमार, संजय दत्त, मानुषी छिल्लर आणि सोनू सूद अभिनित 'पृथ्वीराज' व रणवीर सिंगचा बिग बजेट फॅमिली एंटरटेनर 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटांचा समावेश आहे.
प्राइम व्हिडिओ इंडियाचे कंट्री हेड गौरव गांधी म्हणाले, "यशराज फिल्म्स प्रेक्षकांना सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी ओळखले जाते आणि या चित्रपटांसाठी त्यांच्यासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. प्राइम व्हिडिओमध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठे आणि सर्वोत्तम मनोरंजन आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि यशराज फिल्म्ससोबतची ही भागीदारी त्या वचनबद्धतेचे परिपूर्ण शोकेस आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही प्रेक्षकांचे त्यांच्या घरातील आरामात आणि त्यांच्या आवडत्या पडद्यावर मनोरंजन करण्यासाठी सतत ब्लॉकबस्टर चित्रपट आणत आहोत. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर चार आठवड्यांनंतरचा जागतिक डिजिटल प्रीमियर केवळ आमच्या प्राइम सदस्यांनाच आनंद देणार नाही, तर भारत आणि जगभरातील या बहुप्रतिक्षित चित्रपटांपर्यंत पोहोचविण्यात मदत करेल."
यशराज फिल्म्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष अक्षय विधानी म्हणाले, “प्राइम व्हिडिओमध्ये, आम्हाला एक असा सोबती मिळाला आहे. जो केवळ आकर्षक सिनेमॅटिक अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या दृष्टीलाच सामायिक करत नाही. तर भारतीय मनोरंजन परिसंस्थेतील सर्वोत्कृष्ट कथांचे जागतिक स्तरावर वितरण देखील करतो. प्राइम व्हिडिओसोबत या विशेष स्ट्रीमिंग करारावर स्वाक्षरी करण्यास आम्ही उत्साहित आहोत, जे आमच्या आगामी टाइटल्सना भौगोलिक क्षेत्राच्या पलीकडे प्रवास नेण्यास आणि प्राइम व्हिडिओच्या प्रभावी कंटेंट लायब्ररीमध्ये अधिक मोलाची जोड देण्यास सक्षम ठरतील.”
‘यशराज’ च्या चार चित्रपटांसाठी प्राईम व्हिडिओचा एक्सक्ल्यूझिव्ह स्ट्रीमिंग करार! - यशराज फिल्म्स
अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि यशराज फिल्म्स एकत्र आले असून यशराज फिल्म्सच्या 4 बिग बजेट चित्रपटांचे एक्सक्ल्यूझिव्ह स्ट्रीमिंग राईट्स प्राईम व्हिडिओला मिळाले आहेत. यात 'बंटी और बबली 2’, 'शमशेरा', 'पृथ्वीराज' आणि 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटांचा समावेश असणार आहे.