मुंबई - संजय दत्तच्या 'प्रस्थानम' चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. 'प्रस्थानम' नावाच्याच तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यात सत्तेसाठी लढा करणाऱ्या राजकारण्याच्या भूमिकेत संजय दिसला.
प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणाऱ्या टीझरनंतर आता सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. हा राजा लढाईशिवाय आपला वारसा सोडणार नाही. त्याच्या रक्षाणासाठी तो काहीही करेल, अशी पोस्ट शेअर करत संजयनं ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे.
-
#PrassthanamTrailer out on 29 Aug 2019... #Prassthanam stars Sanjay Dutt, Manisha Koirala and Jackie Shroff... Remake of #Telugu film #Prasthanam... Directed by Deva Katta... 20 Sept 2019 release. pic.twitter.com/OJPvX42RJT
— taran adarsh (@taran_adarsh) August 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#PrassthanamTrailer out on 29 Aug 2019... #Prassthanam stars Sanjay Dutt, Manisha Koirala and Jackie Shroff... Remake of #Telugu film #Prasthanam... Directed by Deva Katta... 20 Sept 2019 release. pic.twitter.com/OJPvX42RJT
— taran adarsh (@taran_adarsh) August 26, 2019#PrassthanamTrailer out on 29 Aug 2019... #Prassthanam stars Sanjay Dutt, Manisha Koirala and Jackie Shroff... Remake of #Telugu film #Prasthanam... Directed by Deva Katta... 20 Sept 2019 release. pic.twitter.com/OJPvX42RJT
— taran adarsh (@taran_adarsh) August 26, 2019
२९ ऑगस्टला हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमात मनीषा कोईराला, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, सत्यजीत दुबे, अली फजल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. देवा कट्टा यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक असणार आहे. चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.