ETV Bharat / sitara

'साहो'सोबतच्या क्लॅशमुळे 'या' सिनेमांची बदलली रिलीज डेट, प्रभासनं मानले आभार - रिलीज डेट

सर्व कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांचे आभार मानतो, ज्यांनी 'साहो' चित्रपटामुळे आपल्या सिनेमांच्या रिलीज डेट बदलल्या. 'साहो'च्या संपूर्ण टीमच्यावतीने आभार मानतो आणि तुमच्या चित्रपटांसाठी शुभेच्छा, असं प्रभासनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'साहो'सोबतच्या क्लॅशमुळे या सिनेमांची बदलली रिलीज डेट
author img

By

Published : Aug 7, 2019, 5:26 PM IST

मुंबई - श्रद्धा कपूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास यांचा बहुचर्चित आणि बिग बजेट सिनेमा 'साहो' येत्या ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुरुवातीला हा सिनेमा १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार होता. मात्र, नंतर या तारखेत बदल करत ती ३० ऑगस्ट करण्यात आली. परिणामी या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या इतर चित्रपटांची रिलीज डेटदेखील बदलली गेली.

बिग बजेट 'साहो'सोबतचा बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलणंच सोयीचं समजलं. 'छिछोरे'चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी 'छिछोरे'चं ३० ऑगस्टचं प्रदर्शन रद्द करत हा सिनेमा एक आठवडा उशीरा म्हणजेच ६ सप्टेंबरला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. तर राजकुमार रावच्या 'मेड इन इंडिया'चं प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आलं आहे.

यासाठीचं प्रभासनं एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे आभार मानले आहेत. सर्व कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांचे आभार मानतो, ज्यांनी 'साहो' चित्रपटामुळे आपल्या सिनेमांच्या रिलीज डेट बदलल्या. 'साहो'च्या संपूर्ण टीमच्यावतीने आभार मानतो आणि तुमच्या चित्रपटांसाठी शुभेच्छा, असं प्रभासनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.