हैदराबाद - अनेक मोठ्या आणि छोट्या बजेट चित्रपटांपैकी आदिपुरुष हा एक चित्रपट आहे, ज्याचे शूटिंग महाराष्ट्राबाहेर हलविण्यात येणार आहे. निर्मितीच्या स्थानात बदल झाल्यामुळे निर्मात्यांना याचा भार सोसावा लागणार आहे.
मुंबईत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे महाराष्ट्र सरकारने सर्व शूटिंग रद्द केली आहेत. आदिपुरुषच्या निर्मात्यांनी मुंबई फिल्म सिटीमध्ये भव्य सेट उभा केला आहे. असाच सेट हैदराबादमध्ये उभा करण्यासाठी निर्मात्यांना आणखी खर्च करावा लागेल. तथापि या चित्रपटाचे काही शूटिंग हैदराबादमध्ये झाले आहे. जास्त खर्च न करताही हैदराबादमध्ये शूटिंग होऊ शकते असा सल्ला प्रभासनेही दिला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
एका दैनिक अहवालानुसार प्रभास सुरुवातीपासूनच मुंबईत शूटिंग करण्यास नाखूष होता आणि त्याने चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत याच्याशी नाराजी व्यक्त केली होती. निर्मात्यांनी ओमचे ऐकून मुंबईत शूट सुरू केले पण संपूर्ण कलाकारांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करावी लागली. आता चित्रपटाची निर्मिती रखडली आहे आणि निर्माते पुन्हा रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे प्रभासने अगोदर जे म्हटले होते त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.
हेही वाचा - राजधानी दिल्लीत सर्व सुविधायुक्त १०० खाटांचे रुग्णालय बांधतेय हुमा कुरेशी!